महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डिसेंबरमध्ये 10 कंपन्यांचे येणार आयपीओ

06:58 AM Nov 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विशाल मेगामार्टसह इतरांचा समावेश :20 हजार कोटीची होणार उभारणी

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबर महिन्यामध्ये नव्या कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारामध्ये दाखल होणार आहेत. यामध्ये रिटेल साखळी चेन कंपनी विशाल मेगा मार्ट यांचा समावेश आहे. 10 कंपन्या मिळून आयपीओच्या माध्यमातून 20 हजार कोटी रुपये उभारणार आहेत.

सुपरमार्ट विशाल मेगा मार्टसह ब्लॅकस्टोन यांच्या मालकीची डायमंड ग्रेटिंग फर्म इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट यांचा आयपीओ असणार आहे. त्यासोबत आवान्से फायनान्शियल सर्व्हिसेस, टीपीजी कॅपिटलचे पाठबळ लाभलेली साईलाईफ सायन्सेस, पारस हेल्थ केअर आणि गुंतवणूक बँक डीएएम कॅपिटल अॅडव्हायजर्स या कंपन्यांचाही आयपीओ डिसेंबरमध्ये येणार आहे.

महाराष्ट्रातील विधानसभेच्या निकालांमध्ये त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशच्या लोकसभेच्या पोट निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपला मिळालेल्या विजयांमुळे शेअर बाजाराचा कल सध्याला सकारात्मक दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कंपन्यांनी पुढील महिन्यामध्ये आपल्या आयपीओ आणण्याचे निश्चित केले आहे. विशाल मेगा मार्ट आपल्या आयपीओतून 8 हजार कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. तर इंटरनॅशनल जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट 4 हजार कोटी उभारण्याचा विचार करत आहे. यामध्ये 1250 कोटी रुपयांचे ताजे इक्विटी समभाग सादर केले जातील. आवान्से फायनान्शियल सर्व्हिसेस हे आयपीओतून 3 हजार 500 कोटी रुपयांची उभारणी करणार आहेत. ज्यामध्ये 1 हजार कोटी रुपयांपर्यंतचे ताजे इक्विटी समभाग असतील. वरील कंपन्यांसोबत सुरक्षा डायगॉनिस्टीक, ममता मशिनरी आणि ट्रान्सरेल लायटिंग यांचेही आयपीओ बाजारात येणार आहेत.

1.3 लाख कोटींची झाली उभारणी

हुंडाई मोटर इंडिया, स्विगी, एनटीपीसी ग्रीन एनर्जी, बजाज हाऊसिंग फायनान्स, ओला इलेक्ट्रिक मोबिलीटी, तसेच फस्टक्राय यांची सहकारी कंपनी ब्रेन बीज सोल्युशनसह जवळपास 75 कंपन्यांनी यावर्षी सामूहिकरित्या 1.3 लाख कोटी रुपये आयपीओ उभारणीतून जमवले आहेत. 2023 मध्ये 57 कंपन्यांनी 49 हजार 436 कोटी रुपये उभारले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article