For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधू, मीराबाई चानू यांच्यासह 10 खेळाडू ‘अॅथलीट्स कमिशन’वर बिनविरोध

06:31 AM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
सिंधू  मीराबाई चानू यांच्यासह 10 खेळाडू ‘अॅथलीट्स कमिशन’वर बिनविरोध
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधू आणि मीराबाई चानू यांच्यासह एकूण 10 खेळाडू भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अॅथलीट्स कमिशनवर बिनविरोध निवडून आले आहेत. मंगळवारी ही घोषणा करण्यात आली.

Advertisement

सोमवारी रात्री उशिरा माजी ट्रॅक अँड फील्ड खेळाडू सुधा सिंग यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे, निवडणुकीची प्रक्रिया राबवण्याची गरज उरली नाही; कारण 10 जागांसाठी नेमके 10 उमेदवारच रिंगणात शिल्लक होते. निवडणूक निर्णय अधिकारी संजय के. श्रीवास्तव यांनी मंगळवारी सर्व 10 उमेदवारांची (पाच पुरुष आणि पाच महिला) बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. याआधी सोमवारी, आघाडीचे बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली होती. ‘अॅथलीट्स कमिशन’चे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष (ज्यामध्ये एक पुरुष आणि एक महिला असणे आवश्यक आहे) हे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य असतील.

‘अॅथलीट्स कमिशन’चे दोन सदस्य  एक पुरुष आणि एक महिला  भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेचे सदस्य असतील आणि त्यांना मतदानाचा अधिकार असेल. ते 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारी परिषदेच्या निवडणुकीत ‘अॅथलीट्स कमिशन’चे प्रतिनिधी म्हणून सहभागी होतील.

Advertisement

‘अॅथलीट्स कमिशन’चे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, तसेच भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेसाठीचे दोन प्रतिनिधी निवडण्यासाठीची निवडणूक नंतर घेतली जाईल. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या ‘अॅथलीट्स कमिशन’वर निवड झालेले सदस्य : पी. व्ही. सिंधू, मीराबाई चानू, हरमनप्रीत सिंग, सलिमा टेटे, स्वप्नील कुसाळे, भवानी देवी, तजिंदरपाल सिंग तूर, बोम्बायला देवी, साजन प्रकाश आणि मनजीत सिंग.

Advertisement
Tags :

.