For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

10 वर्षांमध्ये आर्क्टिक होणार बर्फमुक्त

06:55 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
10 वर्षांमध्ये आर्क्टिक होणार बर्फमुक्त

जगावर येणार मोठे संकट

Advertisement

केवळ 10 वर्षांनी आर्क्टिकमध्ये बर्फ दिसून येणार नाही. यामुळे जगभरातील हवामान आणि सागरी पातळीवर प्रभाव पडणार असल्याचा इशारा वैज्ञानिकांनी एका अध्ययनानंतर दिला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडो बोल्डरमध्ये झालेल्या अध्ययनानुसार आर्क्टिकमध्ये उन्हाळ्यातही बर्फ दिसून येतो, परंतु पुढील काही वर्षांमध्ये अशी स्थिती दिसून येणार नाही.

10 वर्षांमध्ये उन्हाळ्यात आर्क्टिकमध्ये बर्फ दिसणे बंद होणार आहे. यासंबंधीचे अध्ययन नेचर रिह्यू अर्थ अँड एनवायरमेंट जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. आर्क्टिकमधून बर्फ बेपत्ता होण्याचा दिवस आता फार लांब नाही, हे केवळ 10 वर्षांमध्ये घडणार आहे, कारण ज्या हिशेबाने तापमान वाढतेय ते अत्यंत धोकादायक असल्याचे अध्ययनात म्हटले गेले आहे.

Advertisement

ग्रीनहाउस वायूंचे उत्सर्जन कमी केले तरीही ही स्थिती येणार आहे. सर्वप्रकाच्या स्थितींची पडताळणी केल्यावर वैज्ञानिकांनी 10 वर्षांमध्ये बर्फ वितळणे निश्चित असल्याचा दावा केला आहे. चालू शतकाच्या मध्यापर्यंत आर्क्टिकच्या समुद्रात सप्टेंबर महिन्यात बर्फ पहायला मिळणार नाही. शतकाच्या अखेरपर्यंत हे दृश्य अनेक महिन्यांपर्यंत दिसणार आहे.

Advertisement

कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन अधिक झाल्याच्या स्थितीतही पृथ्वीच्या उत्तर भागात हिवाळ्यात देखील कमी बर्फ दिसून येणार आहे. याचा अर्थ बर्फ शिल्लकच राहणार नाही असे नाही. वैज्ञानिक भाषेत आर्क्टिकमध्ये 10 लाख चौरस किलोमीटर बर्फ राहिल्यास त्याला बर्फाशिवायचा आर्क्टिक म्हटले जाते.  या भागात सर्वात कमी बर्फ 1980 मध्ये पाहिला गेला होता. अलिकडच्या वर्षांमध्ये आर्क्टिकमध्ये सप्टेंबर महिन्यात सर्वात कमी बर्फ 33 लाख चौरस किलोमीटर इतकी नोंद झाली होती. हे अध्ययन करणाऱ्या वैज्ञानिक एलेक्झेंड्रा जाना यांनी वर्तमान, इतिहास आणि उत्सर्जनाच्या हिशेबाने कॉम्प्युटर मॉडेल्स तयार केल्या, मग त्या आधारावर भविष्यातील बर्फाच्या प्रमाणाचे विश्लेषण पेल.

दरवर्षी 1 लाख चौरस किलोमीटर आकाराचा बर्फ वितळताहे, तर कमाल 18 वर्षांमध्ये आर्क्टिकचा बर्फ उन्हाळ्यात संपुष्टात येणार आहे. ग्रीनहाउस गॅसेसचे उत्सर्जन काम राहिल्यास कमीत कमी दहा वर्षांमध्ये हे दृश्य दिसून येऊ शकते. म्हणजेच 2030 च्या दशकात आर्क्टिक भागात सप्टेंबर महिन्यात बर्फ दिसून येणार नाही. याचा प्रभाव आर्क्टिकवरील प्राण्यांवर सर्वाधिक पडणार आहे. सील आणि ध्रूवीर अस्वल यामुळे प्रभावित होणार आहे. त्या भागात अशाप्रकारचे मासे पोहोचतील, ज्यांचे अस्तित्व तेथे पूर्वी आढळून येत नाही. यामुळे स्थानिक इकोसिस्टीमवर नव्या प्रजातींची घुसखोरी होईल, त्याचा प्रभाव किती पडेल हे शोधणे अत्यंत अवघड आहे.

दुसरीकडे बर्फ वितळल्याने समुद्राच्या लाटा वेगाने किनाऱ्यांना धडकणार आहेत. यामुळे किनारी भाग तुटून समुद्रात कोसळणार आहे. जमीन कमी होत जाईल, प्राण्यांना राहण्यासाठीची जागा कमी होईल. आर्क्टिकमध्ये उन्हाळा म्हणजेच ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंत समुद्रात बर्फ दिसून येणार नसल्याचे मानले जात आहे.  उत्सर्जनाचे प्रमाण वाढले तर चालू शतकाच्या अखेरपर्यंत आर्क्टिकचा भाग 9 महिन्यांसाटी बर्फाशिवाय राहणार आहे. यामुळे आर्क्टिकचा पूर्ण भाग बदलून जाणार आहे.

Advertisement
Tags :
×

.