गोदरेज इंडस्ट्रिजने उभारले 1 हजार कोटी
07:00 AM Nov 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली : गोदरेज समूहातील कंपनी गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी देशांतर्गत बाजारातून 1 हजार कोटी रुपयांची उभारणी केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ही रक्कम बिगर परिवर्तनीय रोख्यांच्या माध्यमातून उभारण्यात आली आहे. कंपनीने साडेतीन वर्षांच्या अवधीचे रोखे 8.1 टक्के व्याजाच्या दरावर सादर करून 500 कोटी रुपये उभारले आहेत. यासोबतच पाच वर्षाच्या अवधीच्या रोख्यांच्या माध्यमातून 8.15 टक्के व्याजाच्या दरानुसार 500 कोटी रुपये जमवले आहेत. कंपनी या रकमेचा उपयोग आपल्या गरजेच्या गोष्टींसाठी करणार असून त्याचप्रमाणे आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठीही करणार आहे. क्रिसिल आणि इक्रा या रेटिंग संस्थानी एए प्लस रेटिंग दिले आहे. गोदरेज इंडस्ट्रीची गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स, गोदरेज अॅग्रोवन लिमिटेड आणि गोदरेज प्रॉपर्टीज यामध्ये हिस्सेदारी आहे.
Advertisement
Advertisement