For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

6 कंपन्यांच्या बाजारमूल्यात 1 लाख 30 हजार कोटींची वाढ

06:05 AM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
6 कंपन्यांच्या बाजारमूल्यात 1 लाख 30 हजार कोटींची वाढ
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

मागच्या आठवड्यात आघाडीवरील दहा कंपन्यांपैकी सहा कंपन्यांचे बाजार मूल्य 1 लाख 30 हजार 734 कोटी रुपयांनी वाढले होते. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय बँक यांच्या बाजार भांडवलात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

शेअर बाजारामध्ये एकंदर तेजीचा कल मागच्या आठवड्यामध्ये दिसून आला होता. मागच्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 641 अंकांनी वधारत बंद झाला होता. स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार मूल्य 45158 कोटी रुपयांनी वाढून 7 लाख 15 हजार 218 कोटी रुपयांवर पोहोचले होते. दुसरीकडे आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल 28 हजार 726 कोटी रुपयांनी वाढून 7 लाख 77 हजार 750 कोटी रुपयांवर पोहोचले होते. दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलचे बाजार भांडवल 20747 कोटी रुपयांसह 7 लाख 51 हजार 406 कोटी रुपयांवर पोहोचले होते. एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी आयटीसीचे बाजार मूल्य 18914 कोटींसह वाढत 5 लाख 49 हजार 265 कोटी रुपयांवर पोहोचले. एलआयसीचे बाजार भांडवल 9487 कोटी रुपयांनी वाढून 6 लाख 24 हजार 941 कोटी रुपयांवर तर आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसचे बाजार मूल्य 7699 कोटी रुपयांनी तेजी दाखवत 5 लाख 93 हजार 636 कोटी रुपयांवर पोहोचले.

Advertisement

Advertisement
Tags :

.