For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

अंदाधुंद गोळीबारात पॅरिसमध्ये 1 ठार

06:28 AM Oct 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
अंदाधुंद गोळीबारात पॅरिसमध्ये 1 ठार
Advertisement

12 वर्षांची मुलगीही जखमी, संशयिताला अटक

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या पश्चिमेला शुक्रवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे घबराट पसरली. यवेलाइन जिह्यातील त्रापेस शहरात एका व्यक्तीने आपल्या कारमधून अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून किमान चार जण जखमी झाले. जखमींमध्ये एका 12 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलांना सतर्क करून संशयिताला अटक करण्यात आली. सुरक्षा अधिकाऱ्यांनी अद्याप गोळीबारामागील हेतू उघड केलेला नाही.

Advertisement

गोळीबारात जखमी झालेल्यांमध्ये एका 12 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. तथापि, जखमींची ओळख आणि त्यांच्या प्रकृतीबद्दल तपशीलही जाहीर करण्यात आलेला नाही. या घटनेत किमान चार जण जखमी झाल्याची पुष्टी झाली आहे. हल्लेखोराने गोळीबारादरम्यान आपल्या गाडीतून लोकांना लक्ष्य केल्यामुळे उपस्थितांच्या जीवाला धोका निर्माण झाला. एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे या घटनेची तीव्रता वाढली आहे. ही घटना पॅरिसच्या पश्चिमेला फ्रान्समधील यवेलाइन जिह्यात घडली. हल्लेखोराने एका व्यक्तीला लक्ष्य करण्याऐवजी आजूबाजूच्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार केल्याचे त्रापेस शहराचे महापौर अली राबेह यांनी सांगितले. हल्लेखोराचा मोठ्या संख्येने लोकांना ठार मारण्याचा हेतू असू शकतो, अशी चिंता व्यक्त करत महापौरांनी कसून चौकशी करण्याचे निर्देश तपास यंत्रणांना दिले आहेत.

Advertisement
Tags :

.