कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Ratnagiri News: यांत्रिक नौकांना 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारी बंदी, नियमावली जाहीर

05:56 PM May 21, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

३१ जुलै २०२५ वा त्यापूर्वी त्या नौकांना समुद्रात मासेमारीसाठी जाता येणार नाही.

Advertisement

रत्नागिरी : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अध्यादेश, २०२१ अन्वये यावर्षी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधी क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंदी कालावधीत यंत्रचलित व यांत्रिकी नौकांद्वारे समुद्रात मासेमारी केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कुवेसकर यांनी केले आहे.

Advertisement

बंदी कालावधीत सागरी कायद्याचा भंग करुन मासेमारी करणारे मच्छीमार कारवाईस पात्र होतील. पावसाळी मासेमारी बंदी यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहील. पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपरिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचालित नौकांना लागू राहणार नाही. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौका १ जून २०२५ पूर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक आहे.

३१ जुलै २०२५ वा त्यापूर्वी त्या नौकांना समुद्रात मासेमारीसाठी जाता येणार नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर (सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापुढे) खोल समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या नौकांस केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतचे धोरण /मार्गदर्शक सूचना / आदेश लागू राहतील.

राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापर्यंत) यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना आढळल्यास / केल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा), २०२१ च्या कलम १४ अन्वये नौका व नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामुग्री आणि त्यात सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल.

तसेच कलम १७ मधील तरतुदी अन्वये जास्तीत-जास्त कठोर शास्ती लादण्यात येईल. पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात झाल्यास अशा नौकेस शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही.

बंदी कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी नौकास अवागमन निषिध्द आहे. सर्व मच्छीमारी सहकारी संस्था, त्यांचे नौकामालक, सभासद व अन्य संबंधितांनी या प्रसिध्दी निवेदनाची नोंद घेवून विहित बंदी कालावधीत यंत्रचलित व यांत्रिकी नौकांद्वारे समुद्रात मासेमारी केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.

Advertisement
Tags :
@ratnagiri#kokan#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediafisher manfishingfishing boatskokan news
Next Article