For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

कॅलिफोर्नियात गोळीबारात 1 ठार

06:10 AM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
कॅलिफोर्नियात गोळीबारात 1 ठार
Advertisement

फेअरफिल्ड (अमेरिका)  : अमेरिकेचा सर्वात समृद्ध प्रांत मानल्या जाणाऱ्या कॅलिफोर्निया प्रांतातील फेअरफिल्ड येथील एका दुकानाच्या परिसरात करण्यात आलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा  मृत्यू झाला आहे. तर 6 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेतील प्रमाणवेळेनुसार ही घटना शुक्रवारी रात्री उशीरा घडली. अद्याप या प्रकरणातील संशयिताचा शोध लागलेला नाही. तसेच हा दहशतवादी हल्ला आहे काय, हे ही स्पष्ट झालेले नाही. या घटनेच्या चौकशीचा आदेश देण्यात आला असून सर्व शक्यता गृहित धरुन तपास करण्यात येईल, असे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

अद्याप या घटनेचे उत्तरदायित्व कोणीही स्वीकारलेले नाही. सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून संशयिताचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून प्रशासनाने तिचा छडा लावण्याचा निर्धार केला असल्याचे स्पष्ट करण्यात आले. फेअरलिल्ड येथील या दुकानात हॅलोविन साजरा करण्यासाठी सज्जता करण्यात येत असताना हा हल्ला झाला असल्याची माहिती देण्यात आली.

Advertisement
Advertisement
Tags :

.