For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साळगाव कचरा प्रकल्पात 1 कोटी युनिट वीज निर्मिती

12:36 PM Jan 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
साळगाव कचरा प्रकल्पात 1 कोटी युनिट वीज निर्मिती
Advertisement

प्रकल्पासाठी वापरुन राहिलेली वीज जाते गोवा ग्रीडला

Advertisement

पणजी : साळगाव, बार्देश येथील कचरा व्यवस्थापन प्रकल्पातून प्रति महिना सरासरी 8.50 लाख युनिट तर प्रति वर्षी सरासरी 1 कोटी युनिट वीज निर्मिती होते. त्यातील हवी तेवढी वीज प्रकल्पासाठी वापरुन शिल्लक राहिलेली वीज राज्यासाठी असलेल्या ग्रीडला पुरवली जाते, अशी माहिती गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या सूत्रांनी दिली. उत्तर गोव्यातील बहुतांश कचरा साळगावच्या प्रकल्पात पाठवला जातो. साधारण 10 वर्षांपूर्वी म्हणजे 2016 मध्ये हा कचरा प्रकल्प सुरु करण्यात आला होता. त्यावेळी प्रकल्पाची क्षमता कमी असल्यामुळे प्रतिदिन 100 टन कचऱ्यावरच प्रक्रिया होत होती.

परंतु नंतर कलांतराने क्षमता वाढवण्यात आली आणि ती 250 टन प्रति दिन अशी झाली. वर्ष 2021 मध्ये हा बदल करण्यात आला. त्यात 50 टक्के सुका तर 50 टक्के ओल्या कचऱ्याचा समावेश होता. गेल्या 10 वर्षांत सदर प्रकल्पातून सुमारे 5 लाख टनापेक्षा अधिक कचऱ्यावर व्यवस्थापन प्रक्रिया व विल्हेवाट अशी कृती करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या व्यतिरिक्त त्या प्रकल्पातून ओल्या कचऱ्यामार्फत प्रतिदिन 7 टन कंपोस्ट खत तयार होते तसेच आरडीएफ नावाचे इंधन तयार करुन ते विविध उद्योगांना मशिनरीसाठी पाठवण्यात येते. मागील वर्षी 2024 मध्ये सर्वाधिक 92 हजारपेक्षा अधिक टन कचऱ्यावर प्रक्रिया झाली. त्यामुळे साळगांवचा कचरा प्रकल्प गोव्यासाठी फायदेशीर ठरल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.