मासेमारी बंदरांच्या विकासासाठी मालवण तालुक्यास १ कोटी ६० लाखांचा निधी
मालवण । प्रतिनिधी
जिल्हा वार्षिक योजना सन २०२४/२५ अंतर्गत मालवण तालुक्यातील लहान मासेमारी बंदरांचा विकास करणे या लेखाशीर्ष अंतर्गत १ कोटी ६० लक्ष एवढा निधी मंजूर झाला आहे. यासाठी भाजपा नेते निलेश राणे यांनी सर्जेकोट, रेवतळे, देवबाग, दांडी, आचरा तळशील येथे मच्छीमारांची भेट घेऊन त्यांच्या मागणीनुसार या कामांची शिफारस खासदार नारायणराव राणे तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. त्या नुसार रवींद्र यांनी मालवण तालुक्यातील विकासकामांसाठी १ कोटी ६० लक्ष एवढा निधी मंजूर केला असून त्यात, आचरा बंदर कस्टम ऑफिस येथील अस्तित्वातील जेट्टीची लांबी वाढविणे. २० लक्ष, आचरा पिरवाडी येथे मच्छिमार जेटी बांधणे. २० लक्ष, तळाशील खालची तोंडवली येथील नरेंद्र मेस्त यांच्या घरानजीक जेठी बांधणे. ता. मालवण २० लक्ष, दांडी मालवण श्रीकृष्ण मंदिर चौकचार मंदिर ते दक्षिणेकडे स्लोपिंग कम जेटी बांधणे. ता. मालवण ३० लक्ष, देवबाग निकमवाडी खाडी किनारी बंदर जेठी बांधणे. ता. मालवण २० लक्ष, देवबाग निकमवाडी येथे खाडी किनारी मच्छिमारांना मासे उतरविण्यासाठी स्लोपिंग रॅम्प बांधणे. २० लक्ष, रेवतळे मालवण येथे भोजने घर नजिक स्लोपिंग कम जेटी बांधणे. १० लक्ष, सर्जेकोट येथे अस्तित्वातिल जेटीची लांबी वाढविणे, स्लोपिंग जेटी बांधणे. २० लक्ष या कामांचा समावेश आहे.
मालवण किनारपट्टीचा प्राधान्याने विचार करून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार श्री. नारायणराव राणे पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण व भाजपा नेते श्री. निलेश राणे यांचे भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, मालवण शहराध्यक्ष बाबा मोंडकर, मालवण भाजपा सरचिटणीस महेश मांजरेकर, दाजी सावजी आदींनी आभार व्यक्त केले आहेत.