For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेवारस कारमध्ये सापडले 1 कोटी 15 लाख

11:25 AM Jan 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
बेवारस कारमध्ये सापडले 1 कोटी 15 लाख
Advertisement

अंकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Advertisement

कारवार : अंकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 63 वरील रामनगुळ्ळी येथे थांबविण्यात आलेल्या कारमध्ये 1 कोटी 15 लाख रुपये आढळून आले आहेत. निर्मनुष्य ठिकाणी कार कोणी थांबविली आहे? कारचा मालक कोण?, कारमधील रक्कम कुणाच्या मालकीची? याबद्दल अद्याप स्पष्ट उलगडा झालेला नाही. अज्ञातांनी थांबविलेली कार ह्याडाई क्रेटा कंपनीची आहे. हे खरे असले तरी कारच्या रजिस्ट्रेशन आणि क्रमांकावरुन शोध घेण्याचा प्रयत्न केला असता वेगळीच माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पोलीस खातेही चक्रावले आहे. या प्रकरणाबाबत  समजलेली अधिक माहिती अशी, अंकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्मनुष्य असलेल्या रामनगुळ्ळीजवळ सोमवारी संध्याकाळी एक कार थांबविण्यात आल्याचे दिसून आले. कारचा बॉनेट डिक्की उघडलेल्या स्थितीत तर सीट उखडलेल्या अवस्थेत दिसून आले. बराचवेळ ती कार तेथेच असल्याचे दिसून आल्याने स्थानिकांनी कारची माहिती राष्ट्रीय हमरस्त्यावर पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना दिली. पेट्रोलिंग पोलिसांनी ती कार अंकोला पोलीस ठाण्याच्या हवाली केली. कारची पाहणी केली असता कारमध्ये 1 कोटी 15 लाख रुपये आढळून आले आहेत. अंकोला पोलीस ठाण्याचे सीपीआय चंद्रशेखर मठपती, पीएसआय उदप्पा धरेन्नावर, उपनिरीक्षक सुनील, साहाय्यक उपनिरीक्षक नितेश नागेकर आदी कारबद्दल निर्माण झालेले गूढ शोधून काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.