For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यल्लम्मा देवीच्या दानपेटीत 1.96 कोटी रुपये जमा

11:18 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
यल्लम्मा देवीच्या दानपेटीत 1 96 कोटी रुपये जमा
Advertisement

लाखो भाविकांकडून सढळ हस्ते दान

Advertisement

वार्ताहर/बाळेकुंद्री

कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीची मंदिरातील दानपेटी गुरुवारी खोलण्यात आली. या पेटीत भक्तांनी अवघ्या 60 दिवसात 1 कोटी 96 लाखांहून अधिक रक्कमेचे दान रेणुकाचरणी अर्पण केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली मोजणी गुरुवारी पूर्ण झाली. दानपेटीतील दानाची इन पॅमेरा मोजणी करण्यात आली. यासाठी यल्लम्मा मंदिराचे शासनाधिकारी, जिल्हाधिकारी व देवस्थानचे कार्यनिर्वाहक अधिकारी एसबीपी महेश यांनी रितसर अनुमती घेऊन दानपेटी खोलण्यात आली. या दानपेटीतील रक्कम आणि मौल्यवान दागिने मोजण्यात आले. दानपेटीत 1 कोटी 71 लाख रुपये रोख रक्कम, 20 लाख 44 हजार रुपये किमतीचे सोने, 4 लाख 44 हजार रुपये किमतीची चांदी आढळून आली. गेल्या 1 एप्रिल ते 31 मे या 60 दिवसांत भाविकांनी हुंडीत दान केलेली रक्कम, सोने-चांदी मोजण्याचे काम गुरुवारी पूर्ण झाले. ही रक्कम मंदिराच्या विकासाच्या पायाभूत सुविधांसाठी वापरण्यात येणार असल्याचे एसबीपी महेश यांनी तरुण भारत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. देवस्थान व्यवस्थापन समिती अध्यक्ष बसय्या हिरेमठ, सदस्य वाय. वाय. काळप्पनावर, अभियंता ए. बी. मुळ्ळूर, सहाय्यक आयुक्त बसवराज जिरग्याळ, अधीक्षक नागरत्ना चोळण, पॅनरा बँक कर्मचारी व देवस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.