For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

9 कंपन्यांच्या बाजार मूल्यात 1.85 लाख कोटींची वाढ

06:49 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
9 कंपन्यांच्या बाजार मूल्यात 1 85 लाख कोटींची वाढ
Advertisement

सेन्सेक्स 1400 अंकांनी होता वधारला : रिलायन्स आघाडीवर

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय शेअर बाजारात मागच्या आठवड्यात 9 कंपन्यांचे बाजार मूल्य 1.85 लाख कोटी रुपयांनी वाढले असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये दिग्गज रिलायन्स इंडस्ट्रिज आणि एचडीएफसी बँक यांच्या बाजारमूल्यात सर्वाधिक वाढ झाली आहे.

Advertisement

मागच्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 1404 अंकांनी किंवा 1.89 टक्के इतका दमदारपणे वाढत बंद झाला होता. त्याचप्रमाणे 30 समभागांच्या सेन्सेक्स निर्देशांकाने 24 मे रोजी 75,636 अंकांची विक्रमी पातळीही गाठली होती. आघाडीवरील 10 पैकी 9 कंपन्यांचे बाजारमूल्य वाढले असून फक्त आयटीसी या एफएमसीजी क्षेत्रातील कंपनीचे मूल्य मात्र घटले आहे. 9 कंपन्यांचे मूल्य मागच्या आठवड्यात 1 लाख 85 हजार 320 कोटी रुपयांनी  वाढले आहे.

भारती एअरटेल, इन्फोसिस, एसबीआयचाही सहभाग

दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलचे बाजार मूल्य 22,921 कोटी रुपयांच्या वाढीसह 7 लाख 87 हजार 838 कोटी रुपयांवर पोहचले तर हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल मूल्य 9985 कोटी रुपयांच्या वाढीसह 5 लाख 56 हजार 829 कोटी रुपयांवर पोहचले होते. इन्फोसिसचे बाजार मूल्य 8821 कोटी रुपयांनी वाढत 6 लाख 8 हजार 198 कोटी रुपयांवर, एसबीआयचे 6961 कोटींनी वाढत 7 लाख 39 हजार 493 कोटींवर, आयसीआयसीआय बँकेचे 903 कोटी रुपयांनी वाढले होते.

कोणत्या कंपन्यांचे वाढले मूल्य

रिलायन्स इंडस्ट्रिजचे बाजार मूल्य 61,398 कोटी रुपयांनी वाढत 20 लाख 02 हजार 509 कोटी रुपयांवर पोहचले हेते. एचडीएफसी बँकेचे बाजार मूल्य 38,966 कोटी रुपयांनी वाढत 11 लाख 53 हजार 129 कोटी रुपयांवर पोहचले आहे. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे बाजार मूल्य 35,135 कोटी रुपयांनी वाढत 6 लाख 51 हजार 348 कोटी रुपयांवर पोहचले हेते.

Advertisement
Tags :

.