For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

मार्चमध्ये 1.78 लाख कोटी जीएसटी संकलन

06:41 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
मार्चमध्ये 1 78 लाख कोटी  जीएसटी संकलन

दुसरे मोठे संकलन : आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 20.14 लाख कोटींची वसुली

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मार्च 2024 मध्ये जीएसटी संकलन 1.78 लाख कोटी ऊपये इतके झाले आहे. मासिक जीएसटी संकलनाची ही दुसरी सर्वोच्च पातळी आहे. मार्च 2023 च्या तुलनेत मार्च 2024 मध्ये जीएसटी संकलनात 11.5 टक्के वाढ झाली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 20.14 लाख कोटी ऊपयांचे जीएसटी संकलन झाले आहे, जे 2022-23 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 11.7 टक्के अधिक आहे.

Advertisement

मार्च महिन्यात जीएसटी संकलन वाढले आहे. देशांतर्गत व्यवहारांवर जीएसटी संकलनात 17.6 टक्क्मयांनी वाढ झाल्याचे जीएसटी संकलनाचा डेटा जारी करताना अर्थ मंत्रालयाने सांगितले. तसेच 2023-24 या आर्थिक वर्षात जीएसटी संकलनाने प्रथमच 20 लाख कोटी ऊपयांचा टप्पा ओलांडला असून ते 20.14 लाख कोटी ऊपयांवर पोहोचले आहे. एकंदर वार्षिक करसंकलन यापूर्वीच्या  आर्थिक वर्षाच्या तुलनेत 11.7 टक्के जास्त आहे. 2023-24 मध्ये दरमहा सरासरी 1.68 लाख कोटी ऊपये इतके जीएसटी संकलन झाले आहे. त्यापूर्वीच्या वर्षात ते साधारणपणे सरासरी 1.50 लाख कोटी ऊपये इतके होते.

Advertisement

मार्च 2024 च्या जीएसटी संकलनानुसार, 34,532 कोटी रुपये सीजीएसटी, 43,746 कोटी रुपये एसजीएसटी आणि 87,947 कोटी रुपये आयजीएसटी जमा झाला आहे. यापैकी 40,322 कोटी रुपये आयजीएसटी आयात केलेल्या वस्तूंमधून गोळा केलेले आहेत. तर उपकरापोटी 12,259 कोटी ऊपये जमा झाले असून त्यापैकी 996 कोटी ऊपये आयात मालातून जमा झाले आहेत.

आर्थिक वर्ष 2023-24 मधील कलेक्शन

एप्रिल 2023    1.87 लाख कोटी रु.

मे 2023             1.57 लाख कोटी रु.

जून 2023                  1.61 लाख कोटी रु.

जुलै 2023                  1.65 लाख कोटी रु.

ऑगस्ट 2023          1.59 लाख कोटी रु.

सप्टेंबर 2023 1.63 लाख कोटी रु.

ऑक्टोबर 2023      1.72 लाख कोटी रु.

नोव्हेंबर 2023         1.68 लाख कोटी रु.

डिसेंबर 2023 1.65  लाख कोटी रु.

जानेवारी 2024      1.74 लाख कोटी रु.

फेब्रुवारी 2024        1.68 लाख कोटी रु.

मार्च 2024      1.78 लाख कोटी रु.

Advertisement
Tags :
×

.