For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दीड लाख मेट्रिक टन मोफत धान्य

12:48 PM Mar 12, 2025 IST | Radhika Patil
दीड लाख मेट्रिक टन मोफत धान्य
Advertisement

कोल्हापूर  / विनोद सावंत :

Advertisement

केंद्र सरकारने 2020 पासून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (अन्न सुरक्षा योजना) सुरू केली आहे. या योजनेतून देशभरातील सुमारे 80 कोटी शिधा पत्रिकाधारकांना मोफत धान्य वाटप केले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 25 लाख नागरिकांना याचा लाभ होत आहे. वर्षाला 1 लाख 53 हजार 600 मेट्रीक टन धान्य वाटप होत असून आतापर्यंत पाच वर्षात सुमारे 7 लाख मेट्रीक टन धान्य मोफत देण्यात आले आहे.

कोरोना महामारीत देशभरातील जनजीवन विस्कळीत झाले. लॉकडाऊनमुळे अनेकांना नोकरी गमवावी लागली होती. व्यवसायही ठप्प होते. काहींवर उपासमारीची वेळ अली होती. याच पार्श्वभूमीवर मार्च 2020 मध्ये केंद्र शासनाने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना जाहीर केली. कोरोना महामारीमुळे निर्माण होणारा नागरिकांवरील आर्थिक ताण कमी करणे हा योजनेमागचा हेतू होता. प्रारंभी ही योजना एप्रिल-जून 2020 या कालावधीसाठी होती, मात्र त्यानंतर टप्प्या टप्याने मुदतीत वाढ होत गेली. नुकतेच 2028 पर्यंत योजनेला मुदत वाढ दिल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.

Advertisement

भारतातील ज्या नागरिकाकडे शिधापत्रिका उपलब्ध आहे, त्यांना या योजनेंतर्गत दरमहा 5 किलो अतिरिक्त रेशन त्यांच्या कोट्यातील रेशनसह मिळते. शासनाकडून ज्या रेशन दुकानातून रेशन कार्ड मिळाले आहे, त्याच दुकानातून हे धान्य मोफत मिळते. तसेच ही योजना फक्त कार्ड धारकांसाठीच आहे, ज्यांच्याकडे रेशन कार्ड नसेल त्यांना हे मोफत धान्य दिले जात नाही. रेशन कार्ड असेल आणि रेशन विक्रेता दुकानदार या योजनेअंतर्गत कोट्यातील धान्य देण्यास तुम्हाला नकार देत असेल तर टोल फ्री क्रमांकावर किंवा ऑनलाईन तक्रार करु शकता. राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टल वर प्रत्येक राज्यासाठी हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

  • जिल्ह्यात 98 टक्के धान्य उचल

जिह्यामध्ये 25 लाख 18 हजार 269 लाभार्थी आहेत. प्रतिमाह सरासरी 98 टक्के धान्य उचल होत आहे. राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत या योजनेला कोल्हापुरात चांगल प्रतिसाद मिळाला आहे. सर्व लाभार्थ्यांचे आधार क्रमांक शिधापत्रिकेसोबत संलग्न करण्यात आले आहेत.

  • ई केवायसीकडे दुर्लक्ष

काही शिधापत्रिकाधारकांचे आधार प्रमाणिकरण (-केवायसी) केलेले नाही. 9 लाख लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यांनी आधार प्रमाणीकरण केले नसल्यास धान्य बंद होणार आहे.

  • मोफत मिळणाऱ्या धान्यची विक्री, लाभार्थ्यांकडूनच गैरप्रकार

केंद्र शासनाचा ही योजना सुरू ठेवण्याचा उद्देश जरी चांगला असला तरी बहुतांशी लाभर्थी या योजनेचे गैरफायदा घेताना दिसून येत आहे. मोफत मिळणारे धान्याची विक्री केली जात आहे. वास्तविक या प्रकारावर आळा घालण्याची गरज आहे.

  • योजना सुरू -मार्च 2020

वर्षाला मोफत धान्य वाटप -1 लाख 53 हजार 600 मेट्रीक टन

पाच वर्षात धान्य वाटप-7 लाख मेट्रीक टन

लाभार्थी शिधापत्रिकाधारक -5 लाख 90 हजार

अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारक- 51 हजार 811

अंत्योदय कार्ड असणारे लाभार्थी- 2 लाख 21 हजार

प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारक -5 लाख 35 हजार 425

प्राधान्य कुटूंब योजना लाभार्थी संख्या -22 लाख 96 हजार

एकूण लभार्थी -25 लाख 18 हजार

रास्त भाव धान्य दुकानदार-1 हजार 685

जिल्ह्यात दर महिन्याला अन्न सुरक्षा योजनेतून साडेबारा हजार मॅट्रिक टनावर धान्य वाटप केले जाते. राज्यातील इतर जिह्याच्या तुलनेत कोल्हापूर जिह्याचे धान्य वाटपाचे प्रमाण अव्वल क्रमांकावर आहे. अद्यपी काही ग्राहकांनी ई केवायसी केलेली नाही. त्यांनी योजनेचा लाभ पुढे कार्यरत ठेवण्यासाठी त्वरीत ई केवायसी करावी.

                                                                    मोहिनी चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी

Advertisement
Tags :

.