For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात दीड टक्के वाढ

06:13 AM May 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात दीड टक्के वाढ
Advertisement

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेंगळूर :

राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना राज्य सरकारने खूशखबर दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ 1.5 टक्क्यांनी करण्यात आली आहे. मूळ वेतनाच्या 14.25 टक्क्यांवरून 15.75 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. सोमवारी सरकारने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.

Advertisement

2024 च्या वेतनश्रेणीनुसार वेतन घेणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल, याप्रमाणे सुधारित भत्तावाढ देण्यात येणार आहे. राज्य सरकारचे निवृत्त कर्मचारी, कुटुंब निवृत्ती पेन्शनधारक आणि राज्य संचित निधीतून निवृत्तीवेतन घेणारे अनुदानित शिक्षण संस्थांमधील पेन्शनधारकांना देखील ही भत्तावाढ लागू असेल.

Advertisement
Tags :

.