1.4 कोटी ‘फास्टॅग’चे 28 जानेवारीपर्यंत वाटप
नवी दिल्ली
फास्टॅग जागरुकता कार्यक्रम सोशल मीडियासह विविध माध्यमांद्वारे सुरू असून, या वर्षाच्या 28 जानेवारीपर्यंत 1.4 कोटीपेक्षा अधिक फास्टॅग जारी केले आहेत, अशी माहिती सरकारने सोमवारी दिली. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एका प्रश्नाला उत्तर देत राज्यसभेत ही माहिती दिली.
सरकारने जुलै 2019 मध्ये ही घोषणा केली होती की, राष्ट्रीय महामार्ग शुल्क प्लाझावर 1 डिसेंबर 2019 पासून एक लेनला सोडून सर्व लेनला शुल्क प्लाझाची फास्टॅग लेन बनविली जाईल. मात्र, ही मुदत वाढवून 15 डिसेंबर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआय) यांची विनंती आणि नागरिकांच्या गैसुविधा लक्षात घेऊन सरकारने निर्णय घेतला की, 25 टक्के फास्टॅग लेनला तात्पुरते 15 डिसेंबर 2019 पासून 30 दिवसांसाठी संबंधित विभागीय अधिकारी यांच्या मुंजरीनंतर हायब्रिड लेनमध्ये रुपांतरीत केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. फॉस्टॅग जागरुकता कार्यक्रम विविध माध्यमे जसे की, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, होर्डिंग याद्वारे चालविले जात आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.