For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मिरजेत अधिकाऱ्याला 1.37 कोटींचा गंडा

04:48 PM Dec 14, 2024 IST | Radhika Patil
मिरजेत अधिकाऱ्याला  1 37 कोटींचा गंडा
1.37 crores fraud against an officer in Miraj
Advertisement

मिरज : 

Advertisement

ऑनलाईनद्वारे मोबाईल क्रमांक चोऊन व्हॉटस्अॅप व व्हिडीओ कॉलद्वारे एलआयसी अधिकाऱ्याला ब्लॅकमेल कऊन सुमारे एक कोटी, 37 लाख, 379 ऊपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एलआयसीचे विकास अधिकारी किरण दिनकर पवार (वय 51, रा. रमा उद्यान, पंढरपूर रोड, प्लॉट नं. 71, मिरज) यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित दीपक वाधवा आणि कोमला वाधवा उर्फ कोमलदेवी दो ममराज अशा अनोळखी संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

किरण पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वरील संशयित दोघांनी ऑनलाईन इंटरनेटद्वारे पवार यांचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्यानंतर वारंवार व्हॉटस्अॅप कॉल केला. सुरूवातीला रविता सोनी बोलतोय, असे पवार यांना भासविले. त्यानंतर ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. वेगवेगळी अमिषे व भिती दाखवून पवार यांच्याकडे असलेल्या मोबाईल क्रमांकावऊन तसेच त्याला संलग्न असलेल्या बँक खात्यावऊन ऑनलाईन स्वऊपात एक कोटी, 37 लाख, 379 ऊपये उकळले.

Advertisement

नऊ महिन्यानंतर हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार लक्षात आल्यानंतर गुरूवारी किरण पवार यांनी शहर पोलिसात धाव घेतली. तेथे पोलिसांना घडलेला वृत्तांत सांगून फसवणुकीची तक्रार दिली. पोलिसांनी फसवणुकीबाबत दीपक वाधवा आणि कोमला वाधवा उर्फ कोमलदेवी दो ममराज अशा अनोळखी संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार पुन्हा एकदा सुरू झाल्याचे या घटनेवऊन स्पष्ट होते. काही दिवसांपासून ऑनलाईन अरेस्ट, फिशर स्कॅमर आदी फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. सोशल मिडीयावर सर्फींग करीत असताना काहीजण अनोळखी लिंक उघडतात. त्यातून फसवणूक करणाऱ्या ठग्यांच्या हाती आपला मोबाईल क्रमांक लागतो. त्यानंतर फसवणुकीचा सिलसिला सुरू होऊन अनेकजण भितीपोटी पैसे देतात.

त्यामुळे अशा फसवणूक प्रकारापासून नागरिकांनी सावध रहावे. असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. एलआयसीसारख्या नामवंत इन्शुरन्स कंपनीत अधिकारी पदावर काम करणाऱ्या व्यक्तीलाच कोट्यावधीचा गंडा बसल्याने खळबळ उडाली आहे.

Advertisement
Tags :

.