महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तोतया पोलीस अधिकाऱ्याने घातला 1.18 कोटीचा गंडा

10:07 AM Dec 15, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून एका बड्या कंपनीच्या निवृत्त कार्यकारी संचालकाला 1 कोटी 18 लाख ऊपयाचा गंडा घालण्याची घटना घडली आहे. याबाबत जुवारीनगर-सांकवाळ येथील राजीव सहरिया यांनी तक्रार दाखल केली असून सायबर गुन्हा विरोधी विभागाने अज्ञाताविरोधात भा.दं.सं.च्या कलम 419, 420 व आरडब्ल्यू 34 तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम 66 व 66डी अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञाताने मुंबई गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवून 11 नोव्हेंबर रोजी तक्रारदाराला संपर्क साधला. त्याने त्यांच्या  नावे आलेल्या पार्सलमध्ये प्रतिबंधित पदार्थ सापडल्याचे, तसेच बँक खात्यात मनी लाँड्रिंग व्यवहार झाल्याचे सांगितले. हे प्रकरण मिटविण्यासाठी बँक खात्यात पैसे जमा करण्यास भाग पाडले. तक्रारदाराची मुदत पूर्ण झालेल्या कायम ठेवीचे पैसे बँक खात्यात 13 नोव्हेंबर रोजी जमा झाले होते. संशयिताने 16 नोव्हेंबरपर्यंत आयसीआयसीआय आणि पीएनबीच्या खात्यांत मिळून 1 कोटी 18 लाख 5 हजार 105 ऊपये जमा करण्यास भाग पाडून फसवणूक केली. सायबर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article