महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तिरुचिरापल्ली विमानतळावर 1.16 कोटीचे सोने जप्त

06:22 AM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ तिरुचिरापल्ली

Advertisement

तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली विमानतळावर मोठ्या प्रमाणावर सोने जप्त करण्यात आले आहे. सिंगापूरमधून आलेल्या एका प्रवाशाला एक कोटीपेक्षा अधिक किमतीच्या सोन्यासह पकडण्यात आले आहे. सीमाशुल्क विभागाने या कारवाईची माहिती दिली आहे. ग्रीन चॅनेल पार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका प्रवाशाला एअर इंटेलिजेन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी रोखले होते. तपासणीदरम्यान त्याच्याकडून 1.605 किलोग्रॅम सोने जप्त करण्यात आले. या प्रवाशाने गुडघ्याखालील कपड्यांमध्ये पेस्टच्या स्वरुपात सोने लपविले होते.

Advertisement

जप्त करण्यात आलेल्या सोन्याच्या बाजारातील मूल्य 1.16 कोटी रुपये इतके आहे. प्रवासी स्कूट एअरलाइन्स टीआर562 च्या विमानाद्वारे सिंगापूरमधून दाखल झाला होता. याप्रकरणी आता पुढील तपास केला जात आहे.  तिरुचिरापल्ली विमानतळावर मे महिन्यात 3 प्रवाशांना अटक करण्यात आली होती, त्यांच्याकडून 16.17 लाख रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article