For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव जिल्ह्यात 1.05 कोटी टन उसाचे गाळप

11:06 AM Jan 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव जिल्ह्यात 1 05 कोटी टन उसाचे गाळप
Advertisement

साखर कारखान्यांचा यंदाचा गळीत हंगाम मध्यावर : बेळगाव जिल्ह्यात ऊस गाळपात उगार शुगर आघाडीवर : शिल्लक ऊस उचलीसाठी कारखान्यांची धडपड : ऊसतोडीसाठी शेतकऱ्यांचीही लगबग

Advertisement

चिकोडी : नोव्हेंबरपासून सुरू झालेला गळीत हंगाम आता मध्यावर आला असून बेळगाव जिल्ह्यातील 24 साखर कारखान्यांनी सुमारे दोन महिन्यांच्या या गळीत हंगामामध्ये 1.05 कोटी 35 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. उगार शुगर कारखान्याने 64 दिवसांत 9 लाख 15 हजार 270 तर त्या पाठोपाठ हुन्शाळ येथील सतीश शुगर्सने 8 लाख 74 हजार 785, हुदलीच्या बेळगाव शुगर प्रायव्हेट लिमिटेडने 7 लाख 77 हजार 190 तर बेडकिहाळच्या वेंकटेश्वर पावर प्रोजेक्टने 7 लाख 53 हजार टन उसाचे गाळप केले आहे.

नोव्हेंबरपासून कर्नाटकातील बहुतांश साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. प्रत्येक साखर कारखान्याने 45 ते 67 दिवसांपर्यंत आपला गळीत हंगाम केला आहे. बेडकिहाळच्या वेंकटेश्वर साखर कारखान्याची प्रतिदिनी गाळप क्षमता 12000 मे. टन असून 61 दिवसांत 7 लाख 53 हजार टन, जैनापूर येथील ओम शुगरची क्षमता 3000 मेट्रिक टन असून 64 दिवसांत 2 लाख 10 हजार 280 टन, निपाणीच्या हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता 9000 मेट्रिक टन असून 64 दिवसांत 4 लाख 66 हजार 545, कागवाडच्या शिरगुप्पी शुगर्सची क्षमता 8000 टन असून 64 दिवसात 5 लाख 30 हजार 925 टन, उगार शुगर्सची गाळप क्षमता 18000 टन असून 64 दिवसांत 9 लाख 15 हजार 270 टन, रायबाग येथील रेणुका शुगरची क्षमता 3500 टन असून असून 64 दिवसांत 2 लाख 20 हजार 50 टन, आळगवाडी येथील बिरेश्वर शुगरची गाळप क्षमता 10000 टन असून 64 दिवसात 5 लाख 93 हजार 502 टन, बेल्लदबागेवाडी येथील विश्वराज साखर कारखान्याची क्षमता 10000 टन असून 64 दिवसांत 6 लाख 632 टन, संकेश्वरच्या हिरण्यकेशी साखर कारखान्याची गाळप क्षमता 9000 टन असून 64 दिवसांत 4 लाख 25 हजार 978 टन, केंपवाड येथील अथणी शुगर्सची गाळप क्षमता 10000 टन असून 64 दिवसांत 6 लाख 64 हजार 230 टन, हुन्शाळ येथील सतीश शुगर्सची गाळप क्षमता 12000 टन असून 67 दिवसांत 8 लाख 74 हजार 785 टन उसाचे गाळप केले आहे. तसेच नणदी येथील चिदानंद कोरे कारखान्याने 7 लाख 10 हजार मे. टन उसाचे गाळप केले आहे.

Advertisement

मुनवळ्ळी येथील श्री रेणुका शुगरची क्षमता 10000 टन असून 62 दिवसांत 5 लाख 88 हजार 85 टन, कोकटणूर येथील श्री रेणुका शुगर लिमिटेडची गाळप क्षमता 10000 टन असून 62 दिवसात 6 लाख 78 हजार 297 टन, हल्ल्याळ येथील कृष्णा शुगर्सची गाळप क्षमता 7500 टन असून 64 दिवसांत 3 लाख 74 हजार 500 टन, कोळवी येथील श्री रेणुका शुगर्सची गाळप क्षमता 5000 टन असून 64 दिवसांत 2 लाख 90 हजार 328 टन, हुदली येथील बेळगाव शुगर प्रायव्हेट लिमिटेडची गाळपक्ष क्षमता 10000 टन असून 66 दिवसांत 7 लाख 77 हजार 190 टन, सौंदत्ती येथील हर्षा शुगर लिमिटेडची गाळप क्षमता 6000 टन असून 63 दिवसांत 4 लाख 51 हजार 786 टन, हिडकलडॅम येथील संगम साखर कारखान्याची गाळप क्षमता 3500 टन असून 63 दिवसांत 1 लाख 71 हजार 782 टन, रामदुर्ग येथील ईआयडी साखर कारखान्याची गाळप क्षमता 5000 टन असून 64 दिवसांत 2 लाख 58 हजार 651 टन, खानापूर येथील लैला शुगरची गाळप क्षमता 5500 टन असून 31 दिवसांत 90 हजार 76 टन, गोकाक येथील प्रभा शुगरची गाळप क्षमता 2500 टन असून 62 दिवसांत 1 लाख 54 हजार 492 टन, बैलहोंगल येथील सोमेश्वर साखर कारखान्याची गाळप क्षमता 5000 टन असून 58 दिवसांत 1 लाख 58 हजार 328 टन, एम. के. हुबळी येथील मलप्रभा साखर कारखान्याची गाळप क्षमता 3500 टन असून 45 दिवसांत 1 लाख 14 हजार 395 टन, शिवसागर साखर कारखान्याची गाळप क्षमता 3500 टन असून 47 दिवसांत 1 लाख 72 हजार 440 टन असे एकूण 24 कारखान्यांची प्रतिनिधी 1 लाख 81 हजार 500 मेट्रिक टन ऊस गाळपाची क्षमता असून दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये 1 कोटी 05 लाख 35 हजार 547 टनहून अधिक मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.

बागलकोट जिह्यात यादवाड कारखाना अग्रेसर

बागलकोट जिह्यातील 11 कारखान्यांचा गळीत हंगाम जोमाने सुरू असून मुधोळ येथील निराणी शुगरची क्षमता 20000 टन असून 53 दिवसांत या कारखान्याने 11 लाख 23 हजार 639 टन, यादवाड येथील आयसीपीएल कारखान्याची गाळप क्षमता 24000 टन असून 61 दिवसात 13 लाख 28 हजार 825 टन, समीरवाडी येथील गोदावरी साखर कारखान्याची गाळप क्षमता 18000 असून 63 दिवसांत 11 लाख 28 हजार 940 टन, हिप्परगी येथील श्री साई प्रिया साखर कारखान्याची गाळप क्षमता 15000 टन असून 63 दिवसांत 9 लाख 5 हजार 656 टन, श्री प्रभूलिंगेश्वर शुगरची गाळप क्षमता 15000 टन असून 60 दिवसात  8 लाख 33 हजार 601 टन, हिरेपडसलगी येथील जमखंडी शुगरची गाळप क्षमता 10000 टन असून 61 दिवसांत 6 लाख 44 हजार 718 टन, कुंदरगी येथील जीइएम शुगरची गाळप क्षमता 7500 टन असून 60 दिवसांत 6 लाख 22 हजार 48 टन, कल्लापूर येथील एमआरएन केन पॉवर कारखान्याची क्षमता 10000 टन असून 64 दिवसांत 5 लाख 3 हजार 482 टन, आलमट्टी येथील ईआयडी कारखान्याची क्षमता 6000 टन असून 63 दिवसांत 3 लाख 42 हजार 78, केरकलमट्टी येथील केदारनाथ शुगरची गाळप क्षमता 10000 टन असून 63 दिवसांत 3 लाख 50 हजार 644 टन असे एकूण बागलकोट जिह्यातील 10 साखर कारखान्यांची रोज 1 लाख 40 हजार मेट्रिक टन गाळप क्षमता असून 77 लाख 83 हजार 631 टन उसाचे गाळप केले आहे.

विजापूर जिह्यात 6 लाख टन ऊस गाळप

विजापूर जिह्यातील तीन साखर कारखान्यांची गाळप क्षमता प्रतिदिनी 13000 टन असून आतापर्यंत या कारखान्यांनी 6 लाख 157 टन उसाचे गाळप केले आहे.

जवाहरकडून 7 लाख टन ऊस गाळप

सीमावर्ती महाराष्ट्रातील जवाहर सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता 12000 टन असून 46 दिवसांत 7 लाख 3 हजार 200 टन, वारणा येथील तात्यासाहेब कोरे साखर कारखान्याची गाळप क्षमता 10000 टन असून 55 दिवसांत 5 लाख 98 हजार 750 टन, शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता 7500 टन असून 43 दिवसांत 4 लाख 78 हजार 270 टन, कागल येथील शाहू सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता 7500 टन असून 47 दिवसांत 3 लाख 39 हजार 105 टन तर हमिदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याची गाळप क्षमता 5000 टन असून 47 दिवसांत 1 लाख 40 हजार 850 अशा या पाच कारखान्यांची प्रतिदिनी गाळप क्षमता 42000 टन असून दीड महिन्याच्या कालावधीमध्ये या कारखान्यांनी 22 लाख 60 हजार 175 मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.

Advertisement
Tags :

.