For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रॅव्हलर नदीत कोसळून 10 पर्यटकांचा मृत्यू

06:52 AM Jun 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
ट्रॅव्हलर नदीत कोसळून 10 पर्यटकांचा मृत्यू
Advertisement

उत्तराखंडमधील अपघातात 13 जण जखमी, नोएडाहून आलेल्या पर्यटकांचे वाहन अलकनंदा नदीत कोसळले

Advertisement

वृत्तसंस्था/ रुद्रप्रयाग

नोएडा येथील पर्यटकांचे वाहन बद्रिनाथ मार्गावरील अलकनंदा नदीत कोसळून शनिवारी भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 10 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 13 जण बचावल्याचे प्रशासकीय पातळीवरून सांगण्यात आले. अपघातग्रस्त वाहन दिल्लीहून चोपटा तुंगनाथकडे जात होते. या गाडीत चालकासह 23 जण होते. स्थानिक लोकांच्या मते या अपघातात 10 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बद्रीनाथ महामार्गावरील रेंटोलीजवळ हा अपघात झाला. एसडीआरएफ आणि पोलिसांकडून बचावकार्य राबविण्यात आले. प्रथमदर्शनी अपघाताचे कारण अतिवेग असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

 

अपघाताची माहिती मिळताच तुरंग एसडीआरएफचे पथक बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. बचावकार्यानंतर लोकांना बाहेर काढण्यात आले आणि जखमींना उपचारासाठी ऊग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातातील बचावलेल्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना एअरलिफ्ट करून वैद्यकीय उपचारासाठी ऋषिकेश येथे पाठविण्यात आले आहे. तर दोन जखमींना ऊग्णवाहिकेद्वारे नजिकच्या ऊग्णालयात पाठवले आहे. गृहमंत्री अमित शहा आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

सध्या राज्यात चारधाम यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या निमित्ताने आणि पर्यटनासाठी दररोज शेकडो प्रवासी येत असतात. याचदरम्यान, शनिवारी सकाळी ऊद्रप्रयागच्या सहा किलोमीटर आधी श्रीनगरच्या दिशेने मुख्य रस्त्यावर हा भीषण रस्ते अपघात झाला. पर्यटक टेम्पो ट्रॅव्हलरमधून चोपटा येथे जात असताना ती दरीत कोसळून नदीपात्रापर्यंत पोहोचली. यासंबंधी अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे. अपघातात बळी पडलेले काही प्रवासी दिल्ली एनसीआरचे असल्याचेही सांगण्यात येत आहे. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफचे पथक मदत आणि बचावकार्यात गुंतले असून या घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Advertisement
Tags :

.