कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देवकर पाणंद ते कळंबा रस्त्यासाठी 1.65 कोटी निधी

03:21 PM May 08, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

देवकर पाणंद  ते जुना कळंबा नाकापर्यंतचा नागरिकांचा खड्डेमय प्रवास आता सुखकर होणार आहे. आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्यातून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सहकार्यातून या रस्तासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 1.65 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. निधीमधून पेव्हर पद्धतीने येथील रस्ता होणार असल्याने या रस्त्याचे रुप पालटणार आहे.

Advertisement

देवकर पाणंद ते जुना कळंबा नाका येथील भाजी मार्केट पर्यंतच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. अक्षरश: खड्ड्यांमध्येच रस्ता शोधण्याची वेळ नागरिक, वाहनधारक यांच्यावर आली होती. खड्ड्यांमधून रस्त्यांचा शोध घेत प्रवास करणे वाहनधारकांसाठी कसरतच बनले होते. तसेच खराब रस्त्यामुळे उडणारी धुळ अन् खड्ड्यांमुळे या मार्गावरुन प्रवास करणारे वाहनधारक, परिसरातील नागरिक यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला होता. तसेच वाहनांचेही नुकसान होत होते. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारक, परिसरातील नागरिक यांच्यामधून होत होती.

विधानसभा निवडणुकीनतंर लगेचच आमदार अमल महाडिक यांनी या रस्त्याची पाहणी केली होती. यावेळी हा रस्ता आयडियल करण्याची ग्वाही आमदार महाडिक यांनी दिली होती. तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना रस्ता दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्याची सूचना आमदार महाडिक यांनी मनपा अधिकाऱ्यांना केली होती. प्रस्ताव सादर झाल्यानंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे रस्ता दुरुस्तीच्या निधीसाठी आमदार महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून जिल्हा नियोजन समितीमधून 1 कोटी 65 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच निधी महापालिकेकडे वर्ग होऊन निविदा प्रक्रिया पूर्ण करुन जलदगतीने रस्त्याचे काम सुरु केले जाणार आहे.

देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिर या रस्त्याची पाहणी केल्यानंतर लवकरात लवकर हा रस्ता करण्याचे अभिवचन नागरिकांना दिले होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मनपा प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या सहकार्यातून रस्त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. शहरासह उपनगरातील रस्ते दर्जेदार होण्यासाठी महायुतीचे सर्वच लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत.

                                                                                                                                                    - आमदार अमल महाडिक.

रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने परिसरातील नागरिकांमधून रस्ता दुरुस्तीची मागणी सुरु होती. खराब रस्त्यामुळे नागरिक, वाहनधारकांची होणारी गैरसुविधा पाहता रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी आमदार अमल महाडिक यांच्यकडे पाठपुरावा सुरु होता. आमदार महाडिक यांनी रस्त्यासाठी निधी उपलब्ध केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. रस्ता दुरुस्ती होणार असल्याने नागरिक, वाहनधारकांची गैरसुविधा टळणार आहे.

                                                                                                                                       - सुधीर राणे, सामाजिक कार्यकर्ते.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article