For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हैदराबादमध्ये फिरकीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांची कसोटी

06:50 AM Jan 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
हैदराबादमध्ये फिरकीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांची कसोटी
Hyderabad: Indian players during a practice session ahead of the first test cricket match between India and England, at Rajiv Gandhi International Cricket Stadium in Hyderabad, Tuesday, Jan. 23, 2024. (PTI Photo/Shailendra Bhojak)(PTI01_23_2024_000235B)
Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने पहिल्या कसोटीसाठीची खेळपट्टी खेळ पुढे जात राहील तशी फिरकीपटूंना मदत करेल, असा अंदाज व्यक्त करून इंग्लंडच्या गोटाला एक सौम्य इशारा दिला आहे. गुऊवारपासून येथे पहिली कसोटी सुरू होणार असून त्यासाठीची खेळपट्टी, विशेषत: त्याच्या दोन्ही बाजूंच्या ‘गूड लेंथ’ भागापासून कोरडी दिसलेली आहे.

खेळपट्टीच्या स्वरुपाविषयी सांगणे कठीण आहे. एकदा सामना सुरू झाल्यावर पाहावे लागेल. मी खेळपट्टी जितकी पाहिलेली आहे त्यावरून ती चांगली दिसते, असे द्रविडने मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना सुरुवातीला सांगितले. ‘पण खेळपट्टीवर चेंडू थोडा फिरू शकतो. किती लवकर आणि किती जलदरीत्या चेंडू फिरू लागेल याची मला खात्री नाही. पण जसजसा खेळ पुढे जाईल तसतसा तो निश्चितच थोडासा फिरू शकतो, असे द्रविडने पुढे सांगितले.

Advertisement

दुसरीकडे, वेगवान गोलंदाज मार्क वूडने कबूल केले की, इंग्लंडच्या गोटात खेळपट्टीच्या स्वरूपाविषयी चर्चा झाली आहे, परंतु त्यांच्या मनात कोणतीही शंका निर्माण झालेली नाही. ‘आम्ही खेळपट्टीवर चर्चा केली आहे. परंतु मी असे म्हणणार नाही की, त्याबद्दल काळजी करण्याइतपत आम्ही चर्चा केली आहे. आम्ही काही तरी विशेष करू शकतो असा आत्मविश्वास आमच्या गोटात आहे. आमच्याकडे फिरकीपटू आहेत, आमच्याकडे सीम गोलंदाज आहेत, आमच्याकडे चांगले फलंदाज आहेत आणि आमच्या मागे एक चांगला इतिहास आहे’, असे वूड म्हणाला.

मात्र वूडने कबूल केले की, इंग्लंडच्या खेळाडूंना या मालिकेदरम्यान ज्या खेळपट्ट्या मिळतील त्यावर चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. ‘आम्हाला माहीत आहे की, हे एक मोठे काम आहे. येथे येणे आणि आम्हाला ज्यांची सवय आहे तशा खेळपट्ट्या येथे नाहीत म्हणून परिस्थिती कठीण होईल असा विचार करणे योग्य नव्हे. आम्हाला मार्ग काढावा लागेल’, असे त्याने सांगितले. ‘आम्ही जुळवून घेऊ. आमच्याकडे एक असा कर्णधार आहे जो नेहमीच खेळ पुढे नेऊ इच्छितो. त्यामुळे ही एक रंजक मालिका ठरायला हवी’, असे वूड म्हणाला.

तथापि, ही जुळवून घेण्याची प्रक्रिया इंग्लिश फलंदाजांना सोपी जाणार नाही. ‘आम्हाला खेळपट्टी तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला आहे. फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही या खेळपट्टीची मदत होईल. मात्र जसजसा सामना पुढे जाईल तसतसा चेंडू वळू लागेल. पण मला वाटते की, हे खेळाडू त्याला तोंड देण्याच्या आणि धावा काढण्याच्या दृष्टीने पुरेसे अनुभवी आहेत, असे ‘एचसीए’च्या एका पदाधिकऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर बोलताना सांगितले.

दरम्यान, सराव सत्र ऐच्छिक असतानाही मंगळवारी भारतीय खेळाडूंनी मैदानात उतरून घाम गाळला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वगळता संघातील सर्व सदस्यांनी दोन तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या जाळ्यातील सरावात भाग घेतला.

Advertisement
Tags :

.