हेन्केलचा पुण्याजवळ अत्याधुनिक कारखाना
प्रतिनिधी / पुणे
हेन्केल एजी अँड कंपनी केजीएएची संपूर्ण मालकीची उपकंपनी हेन्केल ऍडहेसिव्हस् टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून बुधवारपासून पुण्याजवळ कुरकुंभ येथे आपला नवीन कारखाना सुरू करण्यात आला आहे.
मुंबईतील फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचे कॉन्सुल जनरल डॉ. युर्गन मोर्हर्ड आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरणाचे सीईओ डॉ. पी. अनबलगन यांच्यासह अन्य मान्यवर या वेळी उपस्थित होते. तब्बल 1,00,000चौरस मीटर जागेवर उभारण्यात आलेल्या 51,000 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेला हा भारतातील सर्वात मोठा ऍडहेसिव्हस उत्पादन कारखाना आहे. विविध प्रकारे वापरता येतील, अशी पॅकेजिंग्स, ऑटोमोटिव्ह, शेती व बांधकामाची उपकरणे, इतर उद्योग आणि धातू अशा विविध मार्केट्सच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने हेन्केलच्या क्षमता वाढवण्यात हा नवीन कारखाना मोलाची भूमिका बजावेल, असे हेन्केल एजी अँड कंपनी, केजीएएच्या ऍडहेसिव्ह टेक्नॉलॉजीज बिझनेस युनिटचे मॅनेजमेंट बोर्ड सदस्य आणि एक्झिक्मयुटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट यान-डर्क ऑरिस यांनी सांगितले. उच्च दर्जाच्या उत्पादनांसाठी असलेली प्रचंड मागणी पूर्ण करण्याची क्षमता आम्ही निर्माण केली आहे. या गुंतवणुकीमुळे आम्हाला भविष्यकाळात लाभदायक वाढ करणे शक्मय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.