हीरो मोटोकॉर्पची बीएस-6 प्रणालीची पहिली स्कूटर दाखल
‘प्लेजर 110 एफआय’ मॉडेल सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हीरो मोटोकॉर्प यांची पहिली बीएस-6 प्रणालीवर आधारीत स्कूटर प्लेजर 110 एफआय सादर करण्यात आली आहे. स्कूटरची सेल्फ स्टार्टशीट व्हील मॉडेलची सुरुवातीची किंमत 54 हजार 800 रुपये (एक्स शोरुम) राहणार आहे.
सेल्फ स्टार्ट व्हील मॉडेलची किंमत 56 हजार 800 रुपये(एक्स शोरुम,दिल्ली) आहे. स्कूटर सात कलरमध्ये उपलब्ध होणार असून मॅट लाल, मॅट हिरवा,मॅट एक्सिस गे, ग्लॉसी ब्लॅक, ग्लॉसी ब्लू आदी रंग असणार आहेत. कंपनीने या अगोदर बीएस-6 प्रणालीवर आधारीत इमीशन नॉर्म्सची मोटरसायकल एचएफ डिलक्स स्प्लेंडर आय स्मार्ट सादर केली आहे. हीरो मोटोकॉर्पचा प्रसिद्ध ब्रँड म्हणून प्लेजर ची ओळख आहे.
बीएस-6 इमीशन नॉर्म्स
एफआय इंजिन
स्कूटरमध्ये 110 सीसीचे बीएस-6 इमीशन नॉर्म्सचे इंधन इंजेक्शन इंजिन मिळणार आहे. जे 7000 आरपीएमवर 8 बीएचपी पॉवर आणि 8.7 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. प्लेजर110 बीएस6 स्कूटर एफआय सोबत अत्याधुनिक एक्ससेन्स मिळणार तर क्रोम फिनिश हेडलँप आणि 3 डी लोगोची सुविधा असल्याचे कंपनीने सांगितले आहे.