हिसाशी ताकेयू यांची मारुतीचे नवे एमडी-सीईओ म्हणून नियुक्ती
07:00 AM Mar 25, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली : देशातील कार निर्मितीमध्ये कार्यरत असणारी देशातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकी इंडिया यांनी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून हिसाशी ताकेयूची यांची नियुक्ती केली असल्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने ताकेयूची यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. ते येत्या 1 एप्रिल 2022 पासून आपल्या पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. कंपनीचे सध्याचे प्रमुख केनिची आयुकावा यांचा कार्यकाळ हा 31 मार्च 2022 रोजी पूर्ण होत आहे. आता त्यांच्या पदावर ताकेयूची हे विराजमान होत कंपनीची धुरा सांभाळणार आहेत. मात्र यामध्ये सप्टेंबर महिन्यांपर्यंत कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून ते कंपनीसोबत पूर्णवेळ कार्यरत राहणार असल्याचेही यावेळी कंपनीने स्पष्ट केले आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article