हजार अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स रंगला
निफ्टी निर्देशांक 17 हजारावर, पेटीएमचे समभाग नुकसानीत
वृत्तसंस्था /मुंबई
गुरुवारी होळीदिवशी भारतीय शेअर बाजार तेजीचा रंग उधळत बंद झाल्याचा पहायला मिळाला. पेटीएमचे समभाग मात्र 6 टक्के घसरणीसह नुकसानीत होते.
गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1047 अंकांच्या दमदार तेजीसह 57,863 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही 311 अंकांच्या तेजीसह 17287 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 28 समभाग तेजीसह बंद झाले. बँकिंग क्षेत्रातील समभागांनी शेअर बाजाराला मजबूत आधार दिला. पेटीएमचा समभाग मात्र गुरुवारीही कोसळत असताना दिसला. 6 टक्के म्हणजेच 39 अंकांची घसरण पेटीएममध्ये दिसली. अमेरिकेतील सेंट्रल बँकेतर्फे व्याजदर वाढीचा परिणाम बँकिंग समभागांवर सकारात्मक दिसला आहे. तीन वर्षानंतर व्याजदर वाढवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
याचदरम्यान लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 260 लाख कोटी रुपये राहिले आहे. बुधवारी ते 256 लाख कोटी रुपये होते. गुरुवारी सेन्सेक्स निर्देशांक 804 अंकांच्या वाढीसह 57,620 अंकांवर खुला झाला. एचडीएफसी, ऍक्सिस बँक, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक आणि एशियन पेंटस् यांच्यासह कोटक बँक, आयसीआयसीआय बँक यांचे समभाग 1 ते 5 टक्के वाढत बंद झाले होते. यांच्यासोबत एसबीआय, इंडसइंड बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फिनसर्व्ह, टायटन, टाटा स्टील, मारुती, लार्सन अँड टुब्रो, टीसीएस, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत.
निफ्टी 17 हजारावर
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी सकाळी 17,202 अंकांवर खुला झाला होता. 17344 ची सर्वोच्च पातळी व 17,175 अंकांची नीचांकी पातळी निफ्टीने गाठली होती. तर आशियातील बाजारात टोकीयो, सेऊल, हाँगकाँग आणि शांघाई हे उत्तम लाभासह बंद झाले होते.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- एचडीएफसी..... 2415
- जेएसडब्ल्यू स्टील. 685
- टायटन............ 2703
- एसबीआय इन्शु. 1128
- कोटक महिंद्रा.... 1820
- आयशर मोटर्स... 2436
- रिलायन्स......... 2481
- एशियन पेंटस.... 3136
- टाटा स्टील....... 1303
- मारुती सुझुकी... 7693
- महिंद्रा अँड महिंद्रा 794
- सन फार्मा.......... 911
- डॉ. रेड्डीज लॅब्ज 4042
- एचडीएफसी लाईफ 530
- डीव्हीस लॅब्ज.... 4504
- बजाज ऑटो...... 3650
- अदानी पोर्टस्...... 740
- बीपीसीएल........ 364
- एचडीएफसी बँक 1480
- हिरो मोटो कॉर्प. 2419
- ऍक्सिस बँक........ 739
- टाटा मोटर्स........ 433
- एसबीआय.......... 501
- आयसीआयसीआय 720
- बजाज फिनसर्व्ह 16370
- भारती एअरटेल... 720
- ब्रिटानिया........ 3355
- अल्ट्राटेक सिमेंट. 6373
- पॉवरग्रीड कॉर्प.... 211
- ग्रेसीम............. 1619
- आयटीसी........... 244
- हिंडाल्को............ 576
- विप्रो................. 601
- टीसीएस.......... 3672
- इंडसइंड बँक....... 932
- टेक महिंद्रा....... 1493
- एनटीपीसी......... 132
समभाग घसरलेल्या कंपन्या
- इन्फोसिस........ 1854
- सिप्ला............. 1048
- आयओसी........... 121
- एचसीएल टेक 1196