स्मार्टफोनमध्ये सेल्फी 68, वेळ पाहणे 64 टक्क्यांवर
सर्वेक्षणामधून माहिती समोर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
मोबाईल स्मार्टफोनचा वापर आता कॉलिंगपेक्षा दुसऱया कारणांसाठी अधिक होत असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये नव्या सर्वेक्षणामध्ये प्रत्येक 10 मधील सहा जण मोबाईल फोनशिवाय एक दिवसही राहू शकत नसल्याची माहिती समोर आली असून यातील 68 टक्के लोक सेल्फी तर 64 टक्के लोक वेळ पाहण्यासाठी आपल्या मोबाईलचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. 10 मधील 3 जण कधीही आपल्या फोनशिवाय घरा बाहेर पडत नसल्याची माहिती सर्वेक्षण करणारी कंपनी एचएमडी ग्लोबल यांच्याकडून देण्यात आली आहे.
सदरच्या सर्वेक्षणामधील समावेश असणाऱया जवळपास निम्म्या लोकांना मोबाईल फोनची बॅटरी डिस्चार्ज होण्याची काळजी वाटत असल्याचे दिसले आहे. यातील निम्म्याहून अधिक ग्राहक हे आपले फोन दिवसातून दोनवेळा चार्जिंग करत असून यातील जवळपास 12 टक्के लोकांची फोनची बॅटरी डिस्चार्ज होत आहे.
एक व्यक्ती साधारणपणे दोन तासात स्मार्टफोन स्क्रीन पाहत असतो, सोबत कॉल व्यतिरिक्त जवळपास 50 वेळा आपल्या फोनवरील नोटिफिकेशन तपासत असतो. सर्वेक्षण करणारी कंपनी एचएमडी ग्लोबलचे पॅट्री हेरेनन यांनी म्हटल्याप्रमाणे स्मार्टफोन युजर्सला मागील एक दशकाच्या दरम्यान आपल्या हॅण्डसेटच्या प्रती जास्त आकर्षकता वाटत असल्याचे दिसून आले आहे.
विविध कारणांसाठी मोबाईल वापर सर्वेक्षणातून विविध आकडे समोर आले असून यामध्ये जवळपास 16 टक्के लोक फोनचा वापर आरशाप्रमाणे करतात, तर 62 टक्के हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी तर 27 टक्के लोक मॅप लोकेशन पाहण्यासाठी मोबाईलचा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे.