स्पोर्ट्स mania
यू आर सिम्पली ग्रेट!, नीरज चोप्रा
एखादा ऑलिम्पियन असेल, ऍथलिट वा कोणत्याही क्रीडा प्रकारात सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचलेला क्रीडापटू. यातील प्रत्येकाचे स्वतःचे स्वतंत्र डाएट असते. प्रत्येक जण स्वतंत्र पद्धतीने आपल्या फिटनेसची काळजी घेत असतो. भालाफेकीत भारताला आजवरच्या ऑलिम्पिक इतिहासातील एकमेव सुवर्ण जिंकून देणारा नीरज चोप्रा हा देखील त्याला अपवाद असण्याचे कारण नाही. आजच्या विशेष भागात याच नीरज चोप्राचे डाएट कसे असते, तो सरावाचे नियोजन कसे करतो आणि तंदुरुस्तीसाठी कसे काटेकोर प्रयत्न करतो, हे थोडक्यात पाहुयात!
टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये भारताला भालाफेकीत ऐतिहासिक सुवर्ण जिंकून देत नवा इतिहास रचणारा नीरज चोप्रा आता क्रीडाप्रेमींच्या गळय़ातील ताईत बनला असेल तर यात आश्चर्याचे कारण नाही. त्याने ऑलिम्पिक सुवर्ण जिंकत ऑलिम्पिक सुवर्णपदकाचा कित्येक वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणला. अर्थातच, या यशामागे त्याची कित्येक वर्षांची मेहनत आणि त्याने केलेले त्याग दडलेले आहेत. वास्तविक, भालाफेकीतही प्रचंड ताकद व कमालीचा फिटनेस असणे क्रमप्राप्त असते. तो प्राप्त करण्यासाठी डाएट व वर्कआऊट विशेष महत्त्वाचे असते. यावर नीरज चोप्राने बरेच लक्ष