महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्पोर्ट्स mania

06:00 AM Sep 30, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतीय महिला क्रिकेटची कूल रॉकस्टार, झुलू दी! झुलन गोस्वामी

Advertisement

स्पिरिट ऑफ क्रिकेटच्या मार्गावरुन चालणारी, सहसा स्लेजिंगच्या वादात न पडणारी आणि महिला वनडे क्रिकेटमध्ये 10 हजारपेक्षा अधिक चेंडू टाकणारी भारताची अव्वल दर्जाची जलद-मध्यमगती गोलंदाज झुलन गोस्वामी मागील आठवडय़ात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाली आणि एका देदीप्यमान कारकिर्दीची सांगता झाली. जेथे महिलांनी क्रिकेट खेळू नये, असा प्रवाह होता, तेथे धाडसाने या क्षेत्रात प्रवेश करुन तेथे कारकीर्द गाजवणाऱया काही मोजक्या खेळाडूंमध्ये झुलन गोस्वामीचा आवर्जून समावेश होतो. 39 वर्षांची झुलन गोस्वामी म्हणूनच युवा खेळाडूंसाठी खऱया अर्थाने रोल मॉडेल ठरते.

Advertisement

250 पेक्षा अधिक सामने, 350 पेक्षा अधिक बळी आणि फलंदाजीत जवळपास 2 हजार धावा, असे एकापेक्षा एक माईलस्टोन सर करणारी झुलन गोस्वामी सर्वकालीन सर्वोत्तम महान जलद-मध्यमगती गोलंदाज!

मेडियम पेसर बनना है, तो दिल बडा होना चाहिए, असे आवर्जून सांगणारी झुलन गोस्वामी मूळची पश्चिम बंगालमधील कोलकात्याची. प्रत्येक चेंडू अन् चेंडू, प्रत्येक षटक अन् षटक, प्रत्येक सत्र अन् सत्र, तसेच प्रत्येक सामना अन् सामना, अशा मजल-दरमजल प्रवासावर भर देणाऱया झुलनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याच बळावर एकापेक्षा एक यशाचे इमले रचले.

20 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत कधी पाठीचे दुखणे, कधी कमरेचे दुखणे, कधी गुडघ्याचे दुखणे तर कधी ढोपराचे दुखणे सातत्याने तिचा पिच्छा पुरवत राहिले. पण, तरीही झुलू ना कधी थकली, ना कधी थांबली! एखाद्या मशिनप्रमाणे ती खेळतच राहिली, देशाची सेवा करतच राहिली!

झुलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, त्यावेळी केवळ वेग असून चालणार नाही, गोलंदाजीत वैविध्य आवश्यक आहे, याची तिला जाणीव करुन दिली गेली आणि तिनेही ही बाब मनावर घेत चेंडू दोहो बाजूंनी स्विंग करण्याची कला आत्मसात करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. कोणताही मनुष्य आयुष्यभर विद्यार्थी असतो, हे तिने स्वतःच्या मनावर सातत्याने बिंबवत ठेवले.

अचिव्हमेंट, लाँगेव्हिटी, स्टाईल व ग्रेसियसनेस अशा गुणांमधून महान खेळाडू घडतो, असे ग्राहय़ धरले तर झुलू दी अर्थात झुलन गोस्वामीचा यात प्राधान्याने समावेश होतो. झुलनच्या गोलंदाजीत पॉवर अँडी ब्युटीचा अनोखा मिलाफ होता. तो आता प्रत्यक्ष मैदानात दिसून येणार नाही. मध्यम-जलद गोलंदाजीला नवे आयाम प्राप्त करुन देणाऱया या दिग्गज खेळाडूच्या योगदानाचे करावे तितके कौतुक कमीच. मागील 20 वर्षे 261 दिवस आपल्याला झुलन गोस्वामी संघासमवेत उतरत असल्याचे पाहण्याची सवय होती. ती यापुढे संघासमवेत मैदानात दिसणार नाही.

जेव्हा हजरजबाबी झुलनने कपिल शर्माला विचारले, आप सुनना क्या चाहते हो?

पुरुषांच्या क्रिकेटप्रमाणे महिलांच्या क्रिकेटमध्येही स्लेजिंग होते का आणि होत असल्यास ते स्लेजिंग कोणत्या स्वरुपाचे असते, असा मिश्किल सवाल कपिल शर्माने केला होता आणि त्याला उत्तर देताना झुलनने प्रतिप्रश्न केला. ती म्हणाली, ‘आप सुनना क्या चाहते हो’?

पण, नंतर हास्यविनोदातून बाहेर येत झुलन म्हणाली, ‘स्लेजिंग करुन प्रतिस्पर्धी फलंदाजाची एकाग्रता भंग करण्याऐवजी आम्ही चांगले चेंडू टाकून फलंदाजांना चुकीचे फटके मारण्यास भाग पाडण्यावर भर देतो’.

जवळपास प्रत्येक खेळाडूच्या जडणघडणीत झुलनचा सिंहाचा वाटा

2009 मध्ये हरमनप्रीत कौरने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, त्यावेळी झुलन गोस्वामी आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम बहरात होती. तिने त्यावेळी हरमनप्रीतचे मनोबल उंचावण्यासाठी हरसंभव प्रयत्न केले. शिखा पांडेने प्रथमच चॅलेंजर चषक स्पर्धा खेळली, त्यावेळी झुलनच्या तिच्या पाठीशी समर्थपणे उभी राहिली. अर्चना दासने क्रिकेट कारकिर्दीला नवी दिशा देण्यासाठी हैदराबादमधून बंगाल संघात दाखल होण्याचा धाडसी निर्णय घेतला, त्यावेळी देखील झुलनने तिला सराव होईतोवर पाठबळ दर्शवले.

तंदुरुस्त प्रकृतीसाठी झुलनचे 3 मंत्र

झुलनचा कळकळीचा सल्ला, जंक फूड टाळा!

सध्याच्या जगात प्रकृतीची देखभाल प्रत्येकासाठी आवश्यक झाले आहे. मी स्वतः रोज किमान अर्धा तास जिममध्ये विविध कवायती करते आणि शक्य नसल्यास अर्धा तास धावण्याचा सराव करते. तंदुरुस्त राहणे काळाची गरज आहे आणि यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे जंक फूड टाळा, असा झुलन गोस्वामीचा कळकळीचा सल्ला आहे. नियमितपणे 8 तासांची झोप, सकस आहार व रोज वर्कआऊट, असे रुटिन असेल तर तंदुरुस्तीचे लक्ष्य सहज पार करता येईल, असे निरीक्षण ती याप्रसंगी नोंदवते.

झुलनचा प्रश्न असायचा, क्यों पूछ रही हो? इंटरनेट पे तो सारा मिल जाता है!

1999 मध्ये झुलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि त्यानंतर साधारणपणे दोन दशकांच्या प्रदीर्घ वाटचालीत बऱयाच बाबी बदलल्या. सोशल मीडिया मजबूत झाले. इंटरनेटमुळे माहितीची देवाणघेवाण सहज होऊ लागली. अर्थात, गुगलिंगच्या जमान्यातही झुलनकडे युवा पिढीतील खेळाडूंचे सातत्याने येणे-जाणे, रेलचेल असायचे आणि या युवा खेळाडू झुलनकडे टीप्स मागायच्या, त्यावेळी झुलनची पहिली प्रतिक्रिया अतिशय उत्स्फूर्त असायची. ती म्हणत असे, ‘़अरे! तुम लोगोंको तो सब कुछ पता होता है! अभी इंटरनेट पे तो सब कुछ मिल जाता है! आप मुझे क्यों पूछ रहे हो?’

गोड खायचे नाही, हाच झुलनचा डाएट!

आपल्या आहाराबद्दल बरीच जागरुक असणारी झुलन गोस्वामी प्रोटिन, व्हिटामिन, न्यूट्रिशनबद्दल खास काळजी घेते. मात्र, ठरावीक डाएट करण्याऐवजी तिने गोड खायचे नाही, इतकाच वसा घेतला आहे. आता निवृत्तीनंतर थेट रस्त्यावर उतरत स्ट्रीट फुड एरियात फुचका किंवा डीलिसियस बिर्याणीचा आनंद लुटणे आपल्याला शक्य होईल, असे ती आवर्जून सांगते.

दृष्टिक्षेपात झुलन

सांख्यिकी काय सांगते?

/ कसोटी / वनडे / टी-20

सामने / 12 / 204 / 68

केलेल्या धावा / 291 / 1226 / 405

टाकलेले चेंडू / 2266 / 10005/ 1351

बळी / 44 / 255 / 56

सर्वोत्तम गोलंदाजी / 5-25 / 6-31 / 5-11

झुलनच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाचे विक्रम

सर्वात प्रदीर्घ वनडे कारकीर्द

(पुरुष व महिला क्रिकेटपटू)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article