स्टेनलेस स्टील उद्योगाला बळकटी द्यावी : इसडा
अर्थमंत्रालयाकडे प्रस्ताव सादर
नवी दिल्ली
देशातील पुनर्निर्मिती वाढविण्यासाठी देशातील स्टेनलेस स्टील उद्योगसोबत कार्यरत असणारी संस्था इंडियन स्टेनलेस स्टील डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्याकडून (इसडा) आगामी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याअगोदर निवडक उपाय योजनांचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे. स्टेनलेस स्टीलचे स्क्रॅपसारखा कच्चा माल जो देशात उपलब्ध होत नाही. आणि यासाठी आयात करण्याची आवश्यकता आहे. यामुळे आयात शुल्क माफ करण्याची मागणी अर्थमंत्रालयाकडे सादर केलेल्या प्रस्तावात इसडाने केली आहे.
ग्रेफाइट इलेक्ट्रोलवरील कमीत कमी 20 टक्क्यांपर्यंत निर्यात शुल्क आकारण्याचा सल्ला दिला आहे. तर सध्याचा 7.5 टक्के आयात शुल्क काढून टाकण्याची मागणी केली आहे. कारण स्टेनलेस स्टील पुनर्निर्मितीमधील एक मुख्य कच्चा माल असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पुननिर्मितीमधील प्राथमिक कारखाने आणि त्यांचा कच्चा मालाची उपलब्धता वाढविणे, या अगोदरपासून स्टेनलेस स्टील उत्पादनात वाढ आणि भारतीय पुननिर्मितीस दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. कारण दुसऱया बाजूला इंडोनेशिया, चीन आणि फ्री ट्रेड ऍग्रीमेन्टच्या(एफटीए) माध्यमातून प्रवेश करणाऱया देशांपासून मुख्य स्टेनलेस स्टील उत्पादकांकडून होणारा व्यापार आणि देशातील मुख्य कच्च्या मालांची कमतरता या सारख्या समस्या निर्माण होण्याचे शक्यता व्यक्त केली आहे.