सोनिया गांधी यांना इस्पितळात दाखल
06:08 AM Mar 04, 2023 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
Advertisement
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. 76 वषीय सोनिया यांना गुरुवारी तापामुळे दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून विशेष वैद्यकीय पथक त्यांच्यावर देखरेख ठेवून असल्याचे सोनियांवर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एस. राणा यांनी सांगितले. यापूर्वी 5 जानेवारीलाही त्यांना व्हायरल इन्फेक्शनमुळे दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करावे लागले होते. गेल्यावर्षी 12 जून 2022 रोजीही सोनिया गांधी यांना कोरोनामुळे गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 1 जून रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
Advertisement
Advertisement
Next Article