सेन्सेक्स 931 अंकांनी कोसळला
चढउताराच्या प्रवासात कच्च्या तेलाच्या किंमतीसह जागतिक घटनांचा प्रभाव : निफ्टेतही घसरण
मुंबई :
चालू आठवड्यातील अंतिम सप्ताहात बुधवारच्या सत्रात भारतीय भांडवली बाजारात दुपारच्या दरम्यान मोठी घसरण झाल्याची नोंद करण्यात आली. यामध्ये सकाळी बाजाराने नवी उंची प्राप्त करत विक्रमाची नोंद केली होती. परंतु हे यश अंतिम क्षणापर्यंत टिकवण्यात बाजाराला अपयश आले.
यामध्ये प्रामुख्याने दिवसाच्यामध्यानंतर मोठी नफा वसुली झाली. कच्च्या तेलाच्या किंमतीमधील तेजीने गुंतवणूकदारांनी नफा वसुली केल्याने जागतिक बाजारातही मिळताजुळता कल राहिला. या सर्व घडामोडींचा परिणाम बुधवारी भारतीय बाजारात झाल्याचे दिसून आले. मुख्य कंपन्यांमध्ये बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 930.88 अंकांसह 1.30 टक्क्यांसोबत निर्देशांक 70,506.31 वर घसरुन बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 303 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 21,150.20 वर बंद झाला आहे. बाजारात बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांचे निर्देशांक क्रमश: 3.3 टक्के व 3.5 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत.
चौफेर घसरणीचा दबाव
भारतीय बाजारात बुधवारच्या सत्रात चौफेर असा घसरणीचा कल राहिला होता. यामध्ये मुख्य कंपन्यांपैकी एचडीएफसी बँक ही तेजीत राहिली असून अन्य 29 कंपन्यांचे समभाग हे घसरणीसह बंद झाले आहेत. यात टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक घसरणीत म्हणजे 4.21 टक्क्यांनी नुकसानीत राहिले. तर एनटीपीसी, टाटा मोर्ट्स, एचसीएल टेक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, भारतीय स्टेट बँक, पॉवरग्रिड कॉर्प, टेक महिंद्रा, लार्सन अॅण्ड टुब्रो आणि जेएसडब्ल्यू स्टील यांचे समभाग प्रभावीत झाले आहेत.
जागतिक बाजारात आशियातील अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपनाचा निक्की आणि हाँगकाँगचा हँगसेंग सकारात्मक स्थितीर राहिली होती. तर चीनचा शांघाय कम्पोजिट हा नुकसानीसह बंद झाला. युरोपमधील अधिकांश बाजारात घसरणीची नेंद करण्यात आली होती.
आंतराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.76 टक्क्यांच्या वाढीसोबत 79.83 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले. याच दरम्यान शेअर बाजारातील उपलब्ध आकडेवारीनुसार विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मंगळवारी 601.52 कोटी रुपये किंमतीच्या समभागांची विक्री केली आहे.