सेन्सेक्स 754 अंकांनी वधारला
01:20 PM Feb 04, 2020 IST | Abhijeet Khandekar
Advertisement
ऑनलाईन टीम / मुंबई :
Advertisement
अर्थसंकल्पानंतर झालेली शेअर बाजारातील पडझड आज सावरताना दिसत आहे. आज सकाळी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला होता. त्यानंतर सेन्सेक्सने 754 अंकांची उसळी घेतली आहे. तर निफ्टीही 230 अंकांनी वधारला आहे.
सेन्सेक्स सध्या 40632 अंकांवर तर निफ्टी 11940 अकांवर आहे. जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किंमती कमी झाल्याने आज गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदीला सुरूवात केली. आयसीआयसीआय सिक्मयुरिटीज, पिरामल एन्टरप्राइजेस, एमसीएक्स, जीआयसी हौसिंग, एडलवाईजचे शेअर्स सध्या तेजीत आहेत.
Advertisement
अमेरिका आणि युरोपातील शेअर बाजार तेजीत आहेत. आज चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयात 16 पैशांची वाढ झाली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चीनच्या शेअर बाजारात मात्र पडझड आहे.
Advertisement