सॅमसंग गॅलेक्सी एम 11 चे सादरीकरण
तीन कॅमेऱयांसोबत 5000 एमएएच बॅटरीची सुविधा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दक्षिण कोरियाची प्रसिद्ध टेक कंपनी सॅमसंगकडून गॅलेक्सी एम11 या मॉडेलचे सादरीकरण
करण्यात आले आहे. या स्मार्टफोनला कंपनीने यूएई वेबसाइटला लिस्टेड केले आहे. गॅलेक्सी10एस
च्या पुढील व्हर्जन सादर केले आहे. तर एम आवृत्तीचे स्मार्टफोन नवीन तंत्रज्ञानाचा
वापर करुन सादर केला आहे. या स्मार्टफोनची किंमत मात्र सादर केली नाही.
गॅलेक्सी एम11 या मॉडेलमध्ये विविध प्ररकारची फिचर देण्यात आली
आहेत. यात तीन रिअर कॅमेरा आणि नवीन पंच होल डिस्प्लेचाही समावेश आहे. सोब 5000 एमएएच
क्षमतेची मोठी बॅटरी दिली आहे. तर प्रोसेसरची कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु 1.8
गीगाहर्ट्जचा ऑक्टा कोर प्रोसेसर असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
अन्य फिचर
? एम11 मध्ये 6.4 इंचाचा डिस्प्ले
? ब्लॅक, मॅटेलिक ब्लू आणि वायलेट रंगात मिळणार
? किमतीचा तपशील दिला नसून अंदाजे 10 हजारपर्यंत ? डब्बल नॅनो सिम
? अँड्राइड 9 किंवा 10 ऑपरेर्टिंग सिस्टम
? ऑक्टा कोर प्रोसेसर