For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुमीत नागलला पॅरिस ऑलिंपिकचे तिकीट

06:22 AM Jun 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुमीत नागलला पॅरिस ऑलिंपिकचे तिकीट
Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या 2024 च्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेसाठीचे तिकीट भारतीय टेनिसपटू सुमीत नागलने आरक्षित केले आहे. या स्पर्धेत टेनिस क्रीडा प्रकारातील पुरूष एकेरीच्या विभागात सुमीत नागल आता अधिकृतपणे पात्र ठरला असल्याची माहिती अखिल भारतीय टेनिस फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली आहे.

2020 साली झालेल्या टोकिओ ऑलिंपिक स्पर्धेत सुमीत नागलने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते आणि त्याने पुरूष एकेरीमध्ये दुसरी फेरी गाठली होती. जून 10 पर्यंतच्या एटीपी मानांकनातील सुमीत नागलचे स्थान ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्रता झाल्याने आता तो पॅरिस ऑलिंपिकसाठी जोरदार तयारी करीत आहे. नागलने अलिकडे दोन एटीपी चॅलेंजर स्पर्धा जिंकल्या असल्याने त्याने मानांकनातील पहिल्या 80 टेनिसपटूमध्ये स्थान मिळविले आहे. त्याचप्रमाणे इंडियन वेल्स मास्टर्स व माँटे कार्लो मास्टर्स एटीपी 1000 दर्जाच्या टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीच्या प्रमुख ड्रॉसाठी सुमीत नागल पात्र ठरला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.