महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सीमावादावर राज्य सरकार केंद्राच्या सत्तेपुढे नतमस्तक

07:17 AM Dec 05, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नाना पटोलेंचा हल्लाबोल

Advertisement

प्रतिनिधी/ कराड

Advertisement

कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या कोणत्याची मंत्र्याने बेळगावला येऊ नये म्हणून सांगतात. याचा अर्थ महाराष्ट्रातील सरकार केंद्राच्या सत्तेपुढे नतमस्तक झाले आहे. फक्त सत्तापिपासूपणा आणि राज्याची तिजोरी लुटणे, एवढेच महाराष्ट्रातील ईडी सरकारचे चित्र पाहायला मिळत असल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना केला. जनता महाराष्ट्राचे लचके तोडू देणार नाही, जनतेच्या पाठिशी राहून काँग्रेस सीमावादाची लढाई लढेल, अशी भूमिकादेखील त्यांनी स्पष्ट केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऍड. उदयसिंह पाटील, भानुदास माळी, झाकीर पठाण उपस्थित होते.

खरा इतिहास पुसण्याचा प्रयत्न

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल बोलताना पटोले म्हणाले की, देशाचा खरा इतिहास पुसून टाकायचा, ही मनुवाद्यांची मानसिकता बनलेली आहे. मनुव्यवस्थेच्या आधारे त्यांना जो इतिहास निर्माण करायचाय त्याची ही परिणिती आहे. अडचणीच्या काळात देश उभा करण्याचे काम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले. आज जेवढे रिसर्च सेंटर्स आहेत, ती पंडित नेहरूंनी निर्माण केली आहेत. नेहरूंना देखील ही मंडळी बदनाम करत आहेत. त्यांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा देखील प्रयत्न सुरू झालेला आहे. त्यामुळेच त्यांच्या विचारांचा अपमान केला जात आहे. त्यामुळे जशास तसे उत्तर देण्याची गरज आहे. आम्ही शिवशाहीसोबत राहणार आहोत. ज्यांना पेशवाईसोबत रहायचे असेल त्यांनी राहावे.

पंतप्रधान, गृहमंत्री मतांसाठी गल्लोगल्लीत फिरताहेत

गुजरात निवडणुकीत बुथ ताब्यात घेतले जात असल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. पंतप्रधान, गृहमंत्री मतांची भीक मागण्यासाठी गुजरातमधील गल्लोगल्लीत फिरत आहेत. गुजरातच्या जनतेने भाजपला बाजूला सारण्याचे काम सुरू केले आहे. त्या भीतीपोटीच पंतप्रधानांना गल्लोगल्ली फिरावे लागत असल्याचे नाना पटोले म्हणाले. तसेच गुजरातमध्ये भाजपला सत्तेवरून बाजूला करण्याचा निर्णय जनतेने घेतल्याचे स्पष्ट होत असून काँग्रेसच नंबर एकचा पक्ष म्हणून पुढे येईल, असे चित्र दिसत असल्याचा दावा देखील पटोले यांनी केला.

370 कलम हटविल्याचा काय फायदा झाला?

आश्वासने देऊन भाजपचे सरकार सत्तेवर आले. काश्मिरमधील 370 कलम हटविल्याचा कोणालाच काही फायदा झालेला नाही. तिथे साधी निवडणूक पण घेऊ शकत नाहीत. अजूनही राष्ट्रपती राजवट पाहायला मिळते. आता समान नागरी कायदा आणण्याचे वातावरण निर्माण केले जात आहे. परंतु, देशात पहिल्यापासूनच समान नागरी कायदा आहे. परंतु, शब्दछल करून महागाई, बेरोजगारी, शेतकरी, गरीबांच्या प्रश्नांवरून देशाचे लक्ष विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक हा मुद्दा पुढे आणला जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article