For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्गातही पूर, संकट कायम

05:55 AM Jul 23, 2021 IST | Abhijeet Khandekar
सिंधुदुर्गातही पूर  संकट कायम
1.वरवडे : जानवली नदीला आलेला पूर. पप्पू निमणकर 2.नाटळ : मल्हारनदीवरील पूल कोसळल्याने गावाचा संपर्क तुटला होता. विनय सावंत
Advertisement
  • अनेक गावांचा संपर्क तुटला
  • अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम
  • जिल्हाधिकाऱयांकडून सतर्कतेचे आवाहन
  • 126 घरांची पडझड, 15 लाखाचे नुकसान
  •  वागदे येथे पाणी आल्याने महामार्ग ठप्प

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

Advertisement

सिंधुदुर्गात सलग तेरा दिवस कोसळणाऱया पावसाने गुरुवारी तर दिवसभर पाऊस कोसळतच होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. कणकवलीतील गडनदीला पूर आल्याने मुंबई-गोवा महामार्गावर पाणी येऊन वाहतूक ठप्प झाली होती. आतापर्यंत 126 घरे व 15 गोठय़ांची पडझड झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक व खासगी मालमत्तांचे मिळून 15 लाखाचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. वैभववाडीमध्ये सर्वाधिक पाऊस झाला. या तालुक्मयातील नद्यांना पूर येऊन रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

कुडाळ तालुक्मयातही निर्मला नदीवर पूर आल्याने आंबेरी पूल पाण्याखाली गेले आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करताना अत्यावश्यक कारणासाठीच घराबाहेर पडा,  असे म्हटले आहे.

Advertisement

दरम्यान जिल्हय़ात आतापर्यंत 2438 मि. मी. च्या सरासरीने विक्रमी पाऊस पडला असून गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासांत 63 मि. मी. च्या सरासरीने पाऊस पडला आहे. 10 जुलैपासून जिल्हय़ात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्हय़ातील तलावे, नद्या-नाले तुडुंब भरले आहेत. काही भागात पूरस्थिती आहे. ग्रामीण भागातील अनेक घरांमध्ये पाणी भरून पडझड झाली आहे. आंब्रड, आचरा, कनेडी, फोंडा, उंबर्डे येथील रस्ते खचले आहेत. शेतीमध्ये पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे.

वैभववाडी तालुक्मयातील नद्यांना पूर आल्याने पुलावर पाणी येऊन वाहतूक ठप्प आहे. तिथवला-खारेपाटण जामदा पुलावर, लोरे शिवगंगा नदी पुलावर पाणी आले आहे. करुळ घाटात दरडी कोसळत असल्याने हा घाट अजूनही बंद आहे. कुडाळ तालुक्मयातील निर्मला नदीला पूर आल्याने माणगाव आंबेरी पूल पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे 27 गावांचा संपर्क तुटला आहे.

वैभववाडी तालुक्मयात सर्वाधिक 131 मि. मी. पाऊस

जिल्हय़ात गुरुवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासात वैभववाडी तालुक्मयात सर्वाधिक 131 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्हय़ात सरासरी 63.175 मि. मी. पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 2438.313 मि. मी. पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 75 (2316), सावंतवाडी - 50 (2540.10), वेंगुर्ले - 30.40 (2067.40), कुडाळ - 50 (2286), मालवण - 29 (2792), कणकवली - 77 (2620), देवगड - 63 (2274), वैभववाडी - 131 (2611) असा पाऊस झाला आहे.

खारेपाटण भुईबावडा गगनबावडा राज्य महामार्ग 171 वर झाड पडून काही काळ वाहतूक बंद झाली होती. सध्या हे झाड हटवण्यात आले असून वाहतूक सुरू झाली आहे. लोरे शिवगंगा नदीच्या पुलावर पाणी आलेले असून सदर ठिकाणी वाहतूक बंद केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवगंगा पुलावरील पाण्याची पातळी वाढलेली असून पुलावरील वाहतूक बंद आहे. तिथवली, खारेपाटण जामदा पुलावर पाणी आले असून वाहतूक बंद झाली आहे. शिरशिंगे येथे दरड कोसळली आहे. पण, कोणताही धोका नाही.

पाच घरे, एका गोठय़ाचे नुकसान

अतिवृष्टीमुळे वैभववाडी तालुक्मयातील सडुरे-गावधनवाडी येथील जयश्री बाबाजी सावंत, नाधवडे येथील संतोष झिलू बाणे यांच्या गोठय़ाचे, उंबर्डे-भुतेवाडी येथील सुरेश रहाटे यांच्या घराची संरक्षक भिंत, बळीराम सीताराम दळवी यांच्या घरावर झाड कोसळून नुकसान झाले आहे. मालवण तालुक्मयातील वाक येथील बाबाजी सखाराम मेस्त्राr यांच्या घरावर सागाचे झाड पडून नुकसान झाले आहे. शिळवणेवाडी - तळगाव येथील राजाराम तुकाराम चव्हाण यांचे जुने घर पडून नुकसान झाले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

Advertisement
Tags :

.