महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सायकलचोरांमुळे त्रस्त अमेरिकेतील शहर

07:00 AM Nov 18, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सायकलला लावत आहेत जीपीएस : चोरीच्या तक्रारींमुळे अनेक पोलिसांनी सोडली नोकरी

Advertisement

कॅनडाच्या सीमेनजीक 45 हजार लोकसंख्या असलेले अमेरिकेचे एक शहर सायकल चोरांमुळे त्रस्त आहे. मागील काही महिन्यापांसून सायकल चोरीच्या घटना येथे दररोज घडत आहेत. घर, गॅरेज, बाजार सर्व ठिकाणांहून सायकल चोरीला जात आहेत. अनेक सायकल्सची तर 6-6 वेळा चोरी झाली आहे.

Advertisement

वरमॉन्ट विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या जूनपासून आतापर्यंत 220 सायकल्स चोरीला गेल्या गेल्या असून त्यांची एकूण किंमत अडीच कोटी रुपये आहे. चोराला पकडण्यासाठी शहरातील लोकांनी स्वतःच्या सायकल्समध्ये जीपीएस ट्रकर तर घरांबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.

पोलिसांना डोकेदुखी

सायकलचोरीला जाण्याच्या या घटनांमुळे पोलीस कर्मचारीही वैतागून गेले आहेत. हे पोलीस आता स्वतःची बदल अन्य विभागांमध्ये करवून घेत आहेत. काही पोलिसांनी तर नोकरीच सोडून दिली आहे. अन्य विभागातील पोलीस कर्मचारी येथे येण्यास तयार नाहीत. पोलिसांना सायकल चोरीला उलगडा करता न आल्याने शहरातील लोकांनी स्वतःच्या पातळीवर चोरांना पकडण्यासाठी आणि सायकल मिळविण्यासाठी फेसबुक ग्रूप तयार केले आहेत. शहरातील 4 टक्के लोकसंख्या या फेसबुक ग्रूपशी जोडली गेलेली आहे. माजी महापौर ज्युली विलियम्स बेट्टी या सायकल कंपनी चालवितात, त्यांच्याकडे सायकलचोरीला गेल्याचे सांगणारे दररोज 5-6 फोन कॉल येत आहेत.

जंगलात मिळाल्या सायकल्स

30 वर्षांमध्ये या शहरात एकदाही गोळीबाराची घटना घडली नव्हती, परंतु सातत्याने सायकल चोरली जात असल्याने लोक स्वतःच पोलिसिंग करू लागले आहेत. शहरात यामुळे गुन्हे वाढले आहेत. मागील काही महिन्यांमध्ये गोळीबारच्या 25 घटना घडल्या असुन यात 4 जणांना जीव गमवावा लागला आहे. बर्लिंग्टनमध्ये सायकल्सचे प्रमाण अधिक आहे. लोक जागरुक असल्याने आणि परस्परांची मदत करत असल्याने चोरी झालेल्या अनेक सायकल्स अनेकदा मिळून जातात. कित्येकदा नजीकच्या जंगलात या सायकल्स आढळून आल्या आहेत.

अमली पदार्थांची तस्करी

शहरातील अमली पदार्थांचीत तस्करी करण्यासाठी लोकांच्या सायकल्स चोरल्या जात असल्याचे काही लोकांचे मानणे आहे. अनेक सायकल्स याचमुळे जंगलात आढळून आल्या आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article