साडेनऊ हजार कामगारांच्या हाताला काम; जिल्ह्यातील 625 कारखाने सुरु
सोलापूर/प्रतिनिधी
जिल्ह्यातील 625 कारखाने पुर्ववत सुरु झाल्यामुळे 9476 कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे. जिल्ह्यातील 1043 कारखाने सुरु करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे, त्यापैकी 625 कारखाने सुरू झाले आहेत, अशी माहिती महाव्यवस्थापक बी. टी. यशवंते यांनी आज मंगळवारी दिली.
सुरु झालेल्या 625 प्रकल्पांत 9476 कामगार आहेत. सुरू झालेल्या कारखान्यात जीवनावश्यक वस्तू, मास्क, सॅनिटायझर, रासायनिक खते, बि-बियाणे उत्पादन, औषध निर्मिती, दुग्धजन्य पदार्थ, खनिजावर आधारित उद्योग, इंजिअनिरिंग उद्योग आदी कारखान्यांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.
औद्योगिक प्रकल्प सुरू करण्यासाठी परवानगी
औद्योगिक प्रकल्प सुरू करण्यासाठी एमआयडी सिइंडिया.ओआरजी या वेबसाईटवर अर्ज करावयाचा आहे. कारखाने सुरू करताना कामगारांनी फिजीकल डिस्टन्स ठेवावे, मास्कचा वापर करावा, हात धुवावे अशा सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. कारखाने सुरु करण्याच्या प्रक्रियेविषयी आधिक माहितीसाठी उद्योजकता विभागाचे महाव्यवस्थापक बी. टी. यशवंते यांच्याशी 0217-2605232 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.