महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट
Advertisement

सलग पाचव्या महिन्यातही भारतीय निर्यात क्षेत्रात घसरण

12:07 AM Jan 16, 2020 IST | Tarun Bharat Portal

वृत्तसंस्था / नवी दिल्ली :

Advertisement

भारताची निर्यात डिसेंबर 2018 च्या तुलनेत डिसेंबर 2019 मध्ये 1.8 टक्क्यांनी घसरुन 27.36 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. डिसेंबर 2018 मध्ये भारताची निर्यात 27.86 अब्ज डॉलर झाली असून ही घसरण सलग पाचव्या महिन्यात सलग झाल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

जागतिक पातळीवर मागणीचा विचार केल्यास पेट्रोलिय, इंजिनिअरिंग उत्पादन व रत्ने आणि दागिन्यासारख्या उत्पादनांतील निर्यात कमी राहिली आहे. डिसेंबर 2019 मध्ये आयात 8.83 टक्क्यांनी कमी होऊन 38.61 अब्ज डॉलर्सवर राहिली आहे. यामध्ये सोने आयातीचाही समावेश आहे. आयातीमधील वेगाने झालल्या घसरणीमुळे व्यापारी तूट 11.25 अब्जावर राहिली आहे. उपलब्ध माहितीनुसार डिसेंबर 2018 मध्ये व्यापारी तूट 14.49 अब्ज डॉलर होती. विना पेट्रोलियम आणि विना रत्ने आणि दागिन्याची निर्यात डिसेंबर 2019 मध्ये 21.05 अब्ज डॉलर्सवर स्थिरावली आहे.

निर्यात घटण्याची कारणे

जागतिक पातळीवर आर्थिक मंदीचा वेग अधिक आणि  स्पर्धात्मक वातावरणमुळे देशातील निर्यातीत घसरण नोंदवली आहे. असे इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सलिंग इंडियाचे अध्यक्ष सहगल यांनी स्पष्ट केले आहे.

 

Advertisement
Tags :
#BUSNESS#tarunbharatnews
Advertisement
Next Article