कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सलग दुसऱया दिवशीही बाजारात तेजी

08:38 PM Jan 24, 2020 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अर्थसंकल्पापूर्वीच उत्साहाची नोंद  : सेन्सेक्स 226.79 अंकानी तेजीत

Advertisement

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisement

केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वीच मुंबई शेअर बाजारात (बीएसई) उत्साहाचे वातावरण राहल्याचे पहावयास मिळाले आहे. चालू आठवडय़ातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स तेजी नोंदवत बंद झाला आहे. यामध्ये डिसेंबर तिमाहीत कंपन्यांच्या सकारात्मक नफा कमाईचे आकडे सादर झाल्यामुळे सेन्सेक्स दिवसअखेर 226.79 अंकानी वधारुन निर्देशांक 41,613.19 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 67.90 अंकानी तेजी नोंदवत निर्देशांक 12,248.25 वर बंद झाला आहे.

मुख्य कंपन्यांमध्ये एचडीएफसी 1.02, बजाज फायनान्स 1.56 , लार्सन ऍण्ड टुब्रो 2.03, टायटन 1.91 आणि हीरोमोटो कॉर्प यांचे समभाग 1.53 टक्क्यांनी वधारलेत, तर आयटीमधील टेक महिद्रा आणि एचसीएल यांचे समभाग 2.43 आणि 1.57 ने तेजीत राहिले होते.  तर सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, टीसीएस आणि मारुतीचे समभाग मात्र घसणीसह बंद झाले आहेत.

बँकिंग-सिमेंट कंपन्यांची कामगिरी

अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग सर्वाधिक 2.47 टक्क्यांनी तेजीत राहिले होते. कंपनीने डिसेंबर तिमाहीत 712 कोटी रुपयाची नफा कमाईची नोंद तिमाही आकडेवारीमुळे गुंतवणूकदारांनी कंपनीचे समभाग खरेदी करण्यासाठी मोठा  उत्साह दाखविल्याचे दिसून आले आहे. त्यापाठोपाठ बँकिंग क्षेत्रात केंद्रीय अर्थसंकल्प सादरीकरणापूर्वीच (2020-21) सकारात्मक कामगिरीने शुक्रवारी शेअर बाजारात बंद झाला. दिवसभरात प्रामुख्याने ऍक्सिस बँक 2.01, कोटक बँक 1.98, आयसीआयसीआय बँक 1.18 आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे समभाग 0.25 टक्क्यांनी तेजीत राहिले होते.

तिमाही आकडेवारीचा लाभ

ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीमधील नफा कमाईमुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढल्यामुळे शेअर बाजार योग्य दिशेने प्रवास सुरु असल्याचे शेअर बाजार तज्ञांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
#nationalnews#tarunbharatnews#tarunbharatSocialMediashare bazar
Next Article