For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संरक्षण क्षेत्रात 5 अब्ज डॉलर्स निर्यातीचे उद्दिष्ट

07:45 AM Feb 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
संरक्षण क्षेत्रात 5 अब्ज डॉलर्स निर्यातीचे उद्दिष्ट
PM Narendra Modi inaugurated the Aero India 2023 at Air Force Station Yelahanka in Bengaluru on Monday. -KPN ### inauguration of Aero India 2023
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन : बेंगळुरात एअरो इंडिया शो-2023 चे उद्घाटन

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

येत्या 2024-25 पर्यंत संरक्षण क्षेत्रात 5 अब्ज डॉलर्स निर्यात करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. बेंगळुरातील वायूदलाच्या यलहंका येथील विमानतळावर आयोजित एअरो इंडिया शो-2023 चे उद्घाटन आणि टपाल तिकिटाचे प्रकाशन करून ते बोलत होते. भारत लवकरच जगातील सर्वात मोठा संरक्षण उत्पादन तळ बनणार आहे. देश आज नवी उंची गाठत असून एअरो इंडिया शो-2023 हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

कर्नाटकातील तऊणांना संरक्षण क्षेत्रात भारताला बळकट करण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन करून पंतप्रधानांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या प्रचंड कौशल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. एअरो इंडिया नवीन भारताला प्रतिबिंबित करेल. तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या राज्यात हा एअर शो होत आहे, ही अभिमानाची बाब आहे. त्यामुळे एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.

प्रात्यक्षिक भारताच्या क्षमता वाढवण्याचे उदाहरण

भारत हा केवळ जागतिक संरक्षण उत्पादक कंपन्यांच्या बाजारपेठेपुरता मर्यादित नाही. आज कार्यक्षम संरक्षण भागीदारीचा देश आहे. या भागिदारीत संरक्षण क्षेत्रातील विकसित देशांसह त्यांच्या संरक्षण गरजांसाठी विश्वासार्ह भागीदार शोधणाऱ्या देशांचा समावेश आहे. हे प्रात्यक्षिक भारताच्या क्षमता वाढवण्याचे उदाहरण आहे. या प्रदर्शनात 100 देशांच्या उपस्थितीने भारतावरील जागतिक विश्वास वाढला आहे. जगभरातील 700 हून अधिक प्रदर्शक या प्रदर्शनात सहभागी झाले असून, या प्रदर्शनाने मागील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

संरक्षण क्षेत्राचा भरघोस विकास

बेंगळूरचे आकाश नवभारताच्या ताकदीचा साक्षीदार आहे. सिलिकॉन सिटीचे आकाश हे नव्या भारताचे सत्य असल्याचा आणि संरक्षण क्षेत्रात भारत पोहोचत असल्याचा पुरावा आहे. एअरो इंडिया प्रदर्शनाने गेल्या काही दिवसांपासून आपला दृष्टिकोन बदलला आहे. 21 व्या शतकात नवीन भारत एकही संधी सोडू इच्छित नाही. कठोर परिश्र्रमाकडे मागे-पुढे पाहणार नाहीत. आम्ही प्रत्येक क्षेत्रात क्रांती आणत आहोत. विशेषत: संरक्षण क्षेत्राचा भरघोस विकास झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

भारत आता आयात न करता स्वावलंबनासह संरक्षण उपकरणे निर्यात करत आहे. या दृष्टिने खूप यश मिळत असून संरक्षण क्षेत्रावर वर्चस्व मिळवण्यासाठी प्रगती केली आहे. गेल्या 8-9 वर्षात संरक्षण क्षेत्रात बरीच सुधारणा झाली असून 2025 पर्यंत निर्यातीचे प्रमाण 5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

एअरो इंडिया संरक्षण क्षेत्रात नवी ऊर्जा देणार

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्त्वाखाली भारत सर्व क्षेत्रात प्रगती करत आहे. एअरो इंडिया संरक्षण क्षेत्रात नवी ऊर्जा देणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी पंतप्रधान पूर्णपणे कटिबद्ध असून एअरो इंडिया हे त्याचे उदाहरण आहे. एअरो इंडियामध्ये अनेक देशांचे संरक्षण मंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सशस्त्र दलांचे प्रमुख सहभागी होत आहेत, जे भारताच्या संरक्षण उत्पादन प्रवासाला पूरक ठरेल, असे त्यांनी सांगितले.

कर्नाटक मोठे योगदान देणार : मुख्यमंत्री

भारताला जागतिक नेता बनवण्यासाठी कर्नाटक मोठे योगदान देईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी उद्घाटन केलेल्या एअरो इंडिया शो-2023 कार्यक्रमात सहभागी होऊन ते बोलत होते. या यशासाठी पंतप्रधानांच्या इच्छेनुसार अर्थव्यवस्था, सामाजिक व्यवस्था आणि संरक्षण क्षेत्रात कर्नाटक मोठे योगदान देईल. एअरो इंडिया शोची 14 वी आवृत्ती आकार, कामगिरी आणि प्रदर्शनाच्या दृष्टीने अतिशय खास आवृत्ती आहे. हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात मोठा एअर शो आहे. संरक्षण क्षेत्रात आणि एअर शोमध्ये भारताने आपली क्षमता दाखवून दिली आहे. कोविडमुळे पॅरिस एअर शो आयोजित करण्यात आला नसला तरी आमचा एअर शो यशस्वीपणे पार पडला. यंदा प्रदर्शनाचे क्षेत्र आणि प्रदर्शकांची संख्याही वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘कर्नाटकाने मागे वळून पाहिले नाही’

कर्नाटकात 1940 मध्ये एचएएल, 1950 मध्ये बीएचईएल, बीईएल डीआरडीओची स्थापना करण्यात आली आहे. 1960 मध्ये इस्रो सुरू करण्यात आले असून 1970 मध्ये पहिला उपग्रह आर्यभट्ट बेंगळुरात तयार करण्यात आला. तिथून आम्ही मागे वळून पाहिले नाही. कर्नाटक आता एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील आघाडीचे राज्य आहे. संरक्षण क्षेत्रातील 65 टक्के उत्पादन बेंगळूरमध्ये होत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Air display of Surya Kiran Aerobatics team at the inauguration of the Aero India 2023 at Air Force Station Yelahanka in Bengaluru on Monday. -KPN ### inauguration of Aero India 2023
Advertisement
Tags :

.