संचारबंदीत रत्नागिरी, चिपळुणात चोरटय़ांचा धुडगूस!
रॉयल नगरमध्ये 13 फ्लॅट, पागेवर 2 बंगले फोडले
प्रतिनिधी/ चिपळूण
जिह्यात संचारबंदी सुरु असताना चिपळूणसह रत्नागिरीत चोरटय़ांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. चिपळूण शहरात एकाच रात्रीत रॉयलनगरमधील तब्बल 13 बंद घरे व पाग येथील दोन बंगले फोडले आहेत. यात एका फ्लॅटमधून रोख रकमेसह दागिने व उर्वरित ठिकाणाहून 2 दुचाकी चोरीस गेल्या आहेत. कुवारबाव रेल्वेस्टेशन परिसरात चोरटय़ांनी मोबाईल शॉपी फोडून सुमारे 5 लाखांचा मुद्देमाल लंपास केल़ा एकाच रात्रीत एवढय़ा मोठय़ा संख्येने झालेल्या चोऱयांमुळे जिह्यात खळबळ उडाली आहे.
शहरातील रॉयलनगर येथील संतोष मोहिते गुरुवारी शहराबाहेर असताना चोरटय़ांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरुममधील लोखंडी कपाट फोडले. त्यातून रोख 5 हजार, अंगठी व इतर दागिने चोरले. शुक्रवारी हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. तसेच त्यांच्या लगत असलेली सुनील जाधव, जैनबिन नेवरेकर, बयाजी तांबे, एस.टी. महामंडळात नोकरीस असलेले अरविंद कदम, अली खान यांचीही बंद घरे चोरटय़ांनी फोडली. मात्र चोरटय़ांच्या हाती काहीही लागले नाही. त्यामुळे घरातील साहित्याची त्यांनी नासधूस केली आहे.
लगतच्या फ्लॅटना बाहेरून कडय़ा
या चोऱया करतेवेळी लगतच्या सदनिकांच्या दरवाजांना चोरटय़ांनी बाहेरुन कडय़ा घातल्या होत्या. सकाळी दरवाजे उघडत नसल्याने त्यांना वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांना फोन करुन दरवाजाच्या कडय़ा उघडण्यास सांगाव्या लागल्या.
एका घरातून चक्क अंथरुणाची चोरी
प्रवीण ठसाळे यांची अपार्टमेंटखाली उभी दुचाकी चोरटय़ाने चोरुन नेली. पाग येथील सुभाष जाधव याचा बंद बंगला फोडून चोरटय़ांनी अंथरुण चोरुन नेले. त्यांच्यासमोरील उदय चितळे यांचा बंगला फोडण्याचा प्रयत्न झाला असून त्यांची दुचाकी चोरटय़ाने चोरुन नेली. रॉयलनगर परिसरात आणखी 6 सदानिका फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत झगडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱयांनी घटनास्थळाची पहाणी करुन पंचनामा केला आहे. सदनिकाधारकांच्या तक्रारी देण्याचे काम उशीरापर्यंत सुरु होते. एकापाठोपाठ घडणाऱया या चोरीसत्रामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली आहे.
भिंतीला भगदाड पाडून मोबाईल शॉपीत प्रवेश
रत्नागिरी शहरालगतच्या कुवारबाव रेल्वेस्टेशन परिसरात चोरटय़ांनी मोबाईल शॉपी फोडून सुमारे 5 लाखांचा मुद्देमाल लंपास केल़ा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी रेल्वेस्टेशन परिसरात नव्याने सुरू झालेल्या मँगोज मोबाईल शॉपीत ही चोरी झाल़ी 25 फेबुवारी रोजी रात्री चोरटय़ांनी शॉपीच्या मागील भिंतीला हत्याराने भगदाड पाडून शॉपीमध्ये प्रवेश केला व आतील सुमारे 5 लाख रुपये किंमतीचे मोबाईल चोरून नेले. शुक्रवारी सकाळी चोरी झाल्याचा प्रकार समोर आल़ा शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाल़े चोरांचा मागमूस काढण्यासाठी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आल़े मात्र श्वानपथकाच्या हाती काही विशेष लागले नाह़ी