श्रीलंकेच्या संकटात भारतीय निर्यातीला फायदा?
जाणून घ्या कोणत्या वस्तूंची मागणी वाढली
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
देशाचे कापड केंद्र(Textile Hub) म्हणून ओळख असणारे तिरुपुरमध्ये या दिवसांमध्ये विदेशी ऑर्डर वाढत आहे. हिच स्थिती आसाम आणि दक्षिण भारतामधील टी इस्टेट यांचीही आहे. यामध्ये आपल्याला माहितीच आहे, की या कंपन्यांना अचानक एक्सपोर्ट ऑर्डर का मिळत आहेत? साधारणपणे या ऑर्डर वाढण्यामागे श्रीलंकन कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे.
कारण श्रीलंकन रुपयाची डॉलरच्या तुलनेत झालेली मोठी घसरण यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंचा राहिलेला तुटवडा यामुळे सदरच्या ऑर्डर या भारतीय निर्यातकांना मिळत असल्याचे चित्र आहे.
श्रीलंकन निर्यातकांसमोर समस्या
तिरुपुर एक्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष आर एम शणमुगम यांनी यावेळी म्हटले आहे, की श्रीलंकेमध्ये आलेल्या आर्थिक संकटामुळे निर्मिती क्षेत्र प्रभावीत झाले आहे. भारतामध्ये टेक्सटाईल इंडस्ट्रीजला आता संधी काबीज करता येणार आहे. याच्या विरुद्ध बाजूला श्रीलंकेत कापड उद्योगात बटनापर्यंत आयात करावी लागते. यावेळी त्याच्याकडे विदेशी चलनच आयातीसाठी उपलब्ध नाही आहे. यावरुन श्रीलंकेतील स्थिती किती गंभीर आहे, हे लक्षात येऊ शकते.
चहाचीही मागणी वाढत आहे
श्रीलंका फक्त ऍप्पेरलच नाही तर चहाचाही मोठय़ा प्रमाणात निर्यातदार आहे. परंतु या संकट काळात आता ग्लोबल टी आयात म्हणून भारताकडे पाहिले जात आहे.