शैलेन वूडली अन् लुकास ब्रावो यांचा ब्रेकअप
सोशल मीडियावरून हटविली छायाचित्रे
मागील काही काळापासून अमेरिकन अभिनेत्री शैलेन वूडली आणि फ्रेंच अभिनेता लुकास ब्रावो हे स्वत:च्या रिलेशनशिपवरून चर्चेत राहिले. दोघांनाही अनेकदा एकत्र पाहिले गेले होते. परंतु आता दोघांचा ब्रेकअप झाला आहे. शैलेन वूडली आणि लुकास ब्रावो यांनी सोशल मीडियावरील स्वत:च्या परस्परांसोबतच्या आठवणी पूर्णपणे हटविल्या आहेत.दोन्ही कलाकारांना चालू वर्षाच्या प्रारंभी एकत्र पाहिले गेले होते आणि आता दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत. शैलेन आणि लुकासला मार्च महिन्यात पॅरिस येथे पहिल्यांदा एकत्र पाहिले गेले होते. यानंतर एप्रिल महिन्यात दोघेही सार्वजनिक स्वरुपात समोर आले होते. परंतु आता दोघांनी एकत्र दिसून येणारी सर्व पोस्ट्स सोशल मीडियावरून हटविल्या आहेत.
रिलेशनशिपमध्ये असताना शैलेन आणि ब्रावो यांनी स्वत:च्या प्रेमाची कबुली सोशल मीडियावर दिली होती. स्लॅब सिटी, कॅलिफोर्नियातील ट्रिप आणि स्टार्स वॉर्स डेवर डिस्नेलँडच्या स्टार वॉर्स गॅलेक्सीज एजमध्ये दोघांनी रोमांचक सैरही केली होती. यापूर्वी अखेरचे त्यांना ऑगस्ट महिन्यात ‘एमिली इन पॅरिस’ या सीरिजच्या सेटवर एकत्र पाहिले गेले होते.