For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेअर बाजारात तेजीची उसळी

10:24 PM Feb 04, 2020 IST | Tarun Bharat Portal
शेअर बाजारात तेजीची उसळी
Advertisement

सेन्सेक्स 917 अंकानी वधारला : निफ्टी

Advertisement

वृत्तसंस्था / मुंबई

शेअर बाजार मागील शनिवारी अर्थसंकल्प सादरीकरणानंतर तब्बल 1000 हजार अंकानी घसरला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांना नुकसान झाल्याने बाजाराविषयी एक गुंतवणूकदारांमध्ये नाराजीचा सूर राहिला होता. परंतु तीच उणीव शेअर बाजाराने चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी भरुन काढली आहे. सेन्सेक्स तब्बल 917 अंकानी तेजीत राहिला होता. सोबत कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडीचा फायदा भारतीय शेअर बाजाराला झाला आहे.

Advertisement

दिग्गज कंपन्यांमध्ये सेन्सेक्स 917.07 अंकानी वधारुन निर्देशांक 40,789.38 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 217.75 अंकानी वधारुन 11, 979.65 वर बंद झाला. दिवसभरातील व्यवहारात टायटन कंपनीचे समभाग 7.97 टक्क्यांनी सर्वाधिक तेजीत राहिले आहेत. सोबत आयटीसी, एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि टाटा स्टील यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये बजाज ऑटो आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

मागील आठवडय़ात चीनमधील वेगाने प्रसार होत असणाऱया कोरोना विषाणुच्या धास्तीने बाजारात दबावाच्या वातावरणासह आंतरराष्ट्रीय शेअर बाजारसह देशातील शेअर बाजार घससरले होते. तसाच काहीसा प्रभाव मंगळवारी शेअर बाजारावर झाला असून चीनमधील कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रसारांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती मागील 13 महिन्यांच्या निचांकी पातळीवर आल्या आहेत. यामुळेच शेअर बाजाराने तेजीची उसळी घेतली आहे.  शेअर बाजारात व्यवहार सुरु होण्याच्या 90 मिनिटानंतर बीएसईमधील कंपन्यांनी 2 लाख कोटी रुपयानी भांडवलात वाढ झाली होती. तर सोमावरी याच बाजाराने 153.72 लाख कोटीची कमाई केली होती.

Advertisement
Tags :

.