शेअर बाजारात काही मिनिटांतच 10 लाख कोटींचे नुकसान
ऑनलाईन टीम / मुंबई :
ओमिक्रॉनचे भारतीय शेअर बाजारावरही सावट असल्याचे आज पहायला मिळाले. आज सकाळी शेअर बाजार सुरू होताच काही मिनिटांत सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळला. तर सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला होता. या घसरणीमुळे काही मिनिटांतच गुंतवणुकदारांचे 10.47 लाख कोटींचे नुकसान झाले. शुक्रवारी बाजार भांडवल हे 264.03 लाख कोटी रुपये होते. ते आता 253.56 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
सकाळी 10 वाजून 56 मिनिटांनी बीसीएईची सेन्सेक्स 1322.29 अंकांनी म्हणजेच 2.32 टक्क्यांनी घसरुन 55 हजार 689.45 वर टेड करत होता. तर निफ्टीमध्येही 2.37 टक्क्मयांनी म्हणजेच 402.20 अंकांनी घसरण झाली होती. निफ्टीचा व्यवहार आज 16 हजार 583 वर सुरु झाला.
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली असून, जगाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे केंद्रीय बँकांनी व्याजदरवाढीचा निर्णय घेतल्याने गुंतवणूकदार बाजारातून पैसे काढून घेण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते.