For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शुक्रवारच्या सत्रात भारतीय शेअरबाजाराची विक्रमी झेप

06:32 AM Mar 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
शुक्रवारच्या सत्रात भारतीय शेअरबाजाराची विक्रमी झेप
Advertisement

सेन्सेक्स 1245 अंकांनी दमदार तेजीत : जीडीपी वाढीचा बाजारात उत्साह

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

मजबूत जीडीपी आकडेवारी त्याचप्रमाणे विदेशी गुंतवणुकदारांचा उत्साह या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भारतीय शेअरबाजार नवा विक्रम नोंदवत बंद होण्यामध्ये यशस्वी झाला आहे. सेन्सेक्स तब्बल 1200 अंकांनी आणि निफ्टी 356 अंकांनी वधारत बंद झाला होता. बँकिंग, धातू या निर्देशांकाच्या दमदार तेजीचा फायदा बाजाराला उठवता आला.

Advertisement

शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1245 अंकांच्या विक्रमी वाढीसह 73745 अंकांवर बंद झाला व दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 356 अंकांनी दमदारपणे वाढत 22338 अंकांवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांनी सर्वकालीक उच्चांक प्रस्थापित करण्यामध्ये यश मिळविले होते. गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारामध्ये काहीसा दबाव राहिलेला होता. मात्र शुक्रवारी सकाळच्या सत्रात तेजीसह बाजार सुरु झाल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास अधिकच वाढलेला पहायला मिळाला. आर्थिक वर्षात चौथ्या तिमाहीतील जीडीपी दर 8.4 टक्के इतका राहिल्याने त्याचा परिणाम शेअर बाजारावर सकारात्मक दिसून आला.

अमेरिकेतदेखील महागाई कमी झाल्याचे कारण भारतीय शेअरबाजाराला तेजी राखण्यामध्ये सहाय्यकारक ठरले. बँकिंग, धातू आणि ऑटो निर्देशांक सर्वाधिक तेजीसह कार्यरत होते. फार्मा आणि आयटी निर्देशांकात मात्र दबावाचे वातावरण दिसून आले. समभागांचा विचार करता टाटा स्टीलचा समभाग दमदार तेजीत दिसून  आला. 6.5 टक्के इतका टाटा स्टीलचा समभाग शुक्रवारच्या सत्रामध्ये तेजीत होता. निफ्टी 50 च्या यादीत एल अँड टीचा समभाग 4.33 टक्के वाढत आघाडीवर राहिला होता. याशिवाय जेएसडब्ल्यू स्टील, टायटन यांचे समभाग 4 टक्के वाढत बंद झाले. सार्वजनिक बँकांचा निर्देशांकसुद्धा आज चांगली तेजी दर्शवत होता. बँक निफ्टी निर्देशांक 1166 अंकांनी वधारत 47286 अंकांवर बंद झाला होता. औषध आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या दबावात दिसून आल्या. रे•ाrज् लॅब्स्, इन्फोसिस, सनफार्मा, एचसीएल टेक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. जीडीपी आकडेवारी उत्साहवर्धक राहिल्याने शुक्रवारी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचे पहायला मिळाले.

सेन्सेक्समधील महिंद्रा आणि महिंद्रा, टाटा स्टील आणि जेएसडब्ल्यू स्टील यांचे समभाग 2 टक्क्यांपेक्षा अधिक वाढत बंद झाले. शेअरबाजारात लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 3.3 लाख कोटी रुपयांनी वाढून 391.5 लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते.

Advertisement
Tags :

.